नासिकला रेल्वेच्या चाक निर्मिती व देखरेख कारखाण्याचे अनंत गिते व डाँ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा साजरा ! खासदार हेमंत गोडसेंकडून वचनपूर्ती, ५३ कोटीच्या प्रस्तावास केंद्राच्या अर्थसंकल्पात मंजूरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

           नासिक(१७)::--रेल्वेच्या व्हील निर्मिती (चाक निर्माण व देखरेख डेपो) कारखाना नाशिकमध्ये साकारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार हेमंत गोडसे , तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वेमंत्री पियुष गोयल, सचिव प्रविण गेडाम यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले.
      रेल्वेच्या चाक निर्माण व देखरेख डेपोचे भूमिपूजन आज एकलहरे येथील कर्षण मशीन कारखाना येथे पार पडले. याप्रसंगी केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गिते  बोलत होते. याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे , खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
          यांवेळी अनंत गिते यांनी सांगीतले की, वर्षाला पाचशे रेल्वेचे चाके याठिकाणी बनणार आहेत. तसेच अनेक चाकांची दुरूस्ती व देखभाल होणार असल्याचेही ते म्हणाले. १९८१ मध्ये तत्कालिन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी रेल्वे कर्षण मशिन  कारखान्यासाठी एकलहरे परिसरातील २५० एकर जागा आरक्षित केली होती, कर्षण मशिन च्या लागणाऱ्या जागेव्यतिरिक्त उर्वरीत जागेवर गेल्या ३५ वर्षात आजपर्यंत विस्तारीकरण अथवा कोणताही नवीन सार्वजनिक उपक्रम राबविला गेला नव्हता,
गेल्या वर्षी रेल्वे बोर्ड सदस्य व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकाला भेट दिली असता खासदार गोडसे यांनी सदर जागा विस्ताराअभावी पडून असल्याचे निदर्शनास आणून दिले असता या ठिकाणी सर्व सुविधा असतांना रेल्वेशी संबधित कोणता उपक्रम राबविता येऊ शकतो याबाबत चर्चा करून चाक निर्मिती कारखान्याचा प्रस्ताव मांडून
आज भूमीपूजन करून सन १८-१९ च्या अर्थसंकल्पात ५३ कोटींचा निधीस मंजूरी मिळवून वचनपूर्ती केली.
कर्षण मशिन कारखाना व तेथील कामगारांमध्ये जी भीती होती की नवीन उपक्रम येत नाही व आहे तोही बंद पडतो की काय ? मात्र आजच्या भूमीपूजनाने कामगारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते, तसेच प्रकल्पग्रस्तांच्याही नोकरीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे कुणी आल्यास मी स्वत: लक्ष देईन असे आश्वासन अनंत गिते शेवटी देऊन गेले.
     या उपक्रमाची मुहुर्तमेढ हेमंत गोडसे यांनी रोवली यासाठी त्यांचे सर्व उपस्थितांनी  उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
रेल्वे प्रबंधक आर. के. यादव यांनी कर्षण मशिन कारखाण्याची सन १९८१ पासुनची माहीती व  सुरू असलेल्या प्रगतीपथावरील कामाचा लेखाजोखा मांडला,
आम योगेश घोलप यांनी या उपक्रमाचे "ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार" असे सांगत शिवसेनेची वचनपूर्ती या कारखाण्याच्या पायाभरणी समारंभाने केली याचा आनंद होत आहे.
         समारंभास शिवसेना नासिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी , शहराध्यक्ष सचिन मराठे , महेश बिडवे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव,  सत्यभामा गाडेकर, दत्ता गायकवाड, जयश्री खर्जुल. सुनिता कोठुळे,  सरोज अहिरे, जगन्नाथ आगळे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, डी जी सुर्यवंशी, संतोष साळवे, रविंद्र जाधव, योगेश ताजनपुरे, शंकर घनवटे, निव्रुुत्ती जाधव, रमेश धोंगडे, दिलीप दातीर, शिवाजी निमसे, वैभव खैरे, राहुल ताजनपुरे,  कर्षण मशिन व रेल्वेतील अधिकारी कर्मचारी व कुटुंबिय, रेल्वे पोलीस आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!