शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब च्या भूमिपूजन समारंभास आलेल्या उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीत एकलहरा प्रकल्प होण्याचे मिळाले आश्र्वासन !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प येथे मंजूर असलेल्या ६६० मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पाचे काम सुरु करा- समीर भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांची ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी एकलहरा प्रकल्प होणार ऊर्जा मंत्री बावनकुळे यांचे शिलापूर सिपीआआय कार्यक्रमात आश्वासन. नाशिक, दि.३० जानेवारी :- नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प येथे मंजूर असलेल्या ६६० मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पाचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे उर्जा नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिलापूर येथील भूमिपूजन कार्यक्रमात केली. आज इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या भूमिपूजन करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत पत्र दिले. यावेळी प्रकल्प होणार असे आश्वासन उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. समीर भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक औष्णिक विद्युत केंद्रासाठी एकलहरे, ता. जि. नाशिक येथे ४७२ हेक्टर जागा संपादीत करून १९७० च्या दशकात १४० मेगावॅट चे दोन संच आणि १९८० च्या दशकात २