मराठा द्वेषी भुजबळांना अनामत रक्कम वाचविण्याचे आव्हान !! मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचे प्रसिद्धिपत्रक !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

मराठा द्वेषी भुजबळांना अनामत रक्कम वाचविण्याचे आव्हान !
आरक्षणावर भुजबळ दुटप्पीःजगताप
नाशिक/प्रतिनिधी
सन २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीवर सामाजिक धुळवडीचा थेट परिणाम होणार असल्याचे थेट संकेत मिळू लागले असून विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्यावर छगन भुजबळ यांची दुटप्पी भुमिका कळीचा मुद्दा ठरू शकते असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतलेल्या पविञ्यावरून दिसते.
यासंदर्भात प्राप्त होत असलेल्या संकेतानुसार छगन भुजबळ यांचे मराठा आरक्षणासंदर्भात खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आक्षेप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून घेतला जाऊ लागला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे एक समन्वयक तुषार जगताप यांनी एक प्रसिध्द करून छगन भुजबळ यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांच्यावर मराठा द्वेषी हा जुना आरोप पुन्हा लावला आहे.तुषार जगताप यांनी छगन भुजबळ यांच्यावर टिकास्ञ सोडतांना भुजबळांच्या वळचणीला असलेल्या मराठा बांधवांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे.
तुषार जगताप यांच्या मते भुजबळ परिवाराला मराठा समाजाने पदराखाली आश्रय दिल्यानेच ते राजकारणात आणि समाजकारणातही स्थिरावले.उपमुख्यमंञी झाले.आमदार झाले.पुतण्या खासदार झाला.त्याची जाणीव माञ ते आणि त्यांचा परिवार ठेवतांना दिसत नाही.
भुजबळ परिवाराच्या एकुण राजकारण आणि समाजकारणातील कुटभेदनितीमुळे नाशिक जिल्ह्यातील समाजकारणात राजकीय प्रदुषण वाढत असून त्याचा परिणाम सामाजिक सलोख्यावर होऊ लागला आहे.छगन भुजबळ जेंव्हा जेंव्हा राजकारणात आणि समाजकारणात सक्रीय होतात तेंव्हातेंव्हा समाजात तेढ निर्माण होते.भुजबळ ज्या ओबीसी प्रवर्गाचे नेते म्हणून मिरवतात त्या ओबीसीमध्ये ३४५ हून अधिक छोट्या मोठ्या जाती आहेत.त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून प्रयत्न करण्याऐवजी आजपर्यंत बहुजन समाजासाठी न्यायहक्कांचा त्याग करणार्या मराठा समाजाविरूध्द बहुजन विशेषतः ओबीसी प्रवर्गातील छोट्या छोट्या जातसमुहांना भडकविण्याचे षडयंञ भुजबळ पडद्याआडून करीत आहेत.असा आरोप तुषार जगताप यांनी केला आहे.
आर्थरच्या अंधारषकोठडीतील दोन वर्षाच्या राजकीय विश्रांतीनंतर प्रकाशात आलेल्या छगन भुजबळ यांनी पुण्याच्या पहिल्याच जाहीर भाषणात मराठा आरक्षणाला पाठींबा दिल्याचे ऐकल्यानंतर तमाम मराठा समाज सुखावला होता.भुजबळ यांनी सन २०१४ च्या पराभवातून धडा घेतल्याचे या पाठींब्याच्या वक्तव्यातून जाणवत होते.तथापी भुजबळ यांचे ते मराठा प्रेम औटघटकेचे होते हे त्यानंतरच्या घडामोडीतून दिसत असून आपल्या दावणीला बांधलेल्या समर्थकांकरवी मराठा आरक्षणाला विरोध करण्याचे कारस्थान ते करीत असल्याचे मराठा समाजाच्या लक्षात आले आहे.यावेळी नाशिक लोकसभा मतदार संघातून छगन भुजबळ पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असून मराठा समाज त्यांचे हे स्वप्न उधळवून २०१४ ची पुनरावृत्ती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.असे भाकीत करून तुषार जगताप यांनी छगन भुजबळ यांनी यावेळी अनामत रक्कम वाचवून दाखवावी असे आव्हान दिले आहे.
छगन भुजबळ आणि परिवार,आप्तस्वकीय स्वार्थी असून त्यांचे राजकारण समाजकारण आत्मकेंद्री आहे.भुजबळ चौकडीच्या बाहेर लाभ जाणार नाही याविषयी ते दक्ष असून बाहुबलीवर त्यांचे राजकार समाजकारण तरले आहे.भुजबळ यांच्या सक्रीय होण्यामुळे शहर आणि जिल्ह्यात जातीयवाद आणि गुंडाराज पुन्हा फोफावत असून सामाजिक शांततेला नख लावाले जात असल्याचा आरोपही तुषार जगताप यांनी केला आहे.भुजबळांचा खरा चेहरा मराठा समाजच नव्हेतर तमाम बहुजनांना समजला असून यंदाच्या निवडणूकीत या चेहर्यावरचा बुरखा पुन्हा एकदा फाडला जाईल असा इशाराही या प्रसिध्दी पञकात दिला आहे.
"छगन भुजबळ आणि कंपनीच्या मुठभर मंडळींशिवाय बहुजन समाजातील कुणाही इच्छुकांनी लोकसभेसाठी उमेदवारी केल्यास मराठा समाज मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे साथ देईल."
-तुषार जगताप
समन्वयक मराठा क्रांती मोर्चा
नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !