शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब च्या भूमिपूजन समारंभास आलेल्या उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीत एकलहरा प्रकल्प होण्याचे मिळाले आश्र्वासन !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प येथे मंजूर असलेल्या ६६० मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पाचे काम सुरु करा- समीर भुजबळ
माजी खासदार समीर भुजबळ यांची ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी
एकलहरा प्रकल्प होणार ऊर्जा मंत्री बावनकुळे यांचे शिलापूर सिपीआआय कार्यक्रमात आश्वासन.
नाशिक,दि.३० जानेवारी :-नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प येथे मंजूर असलेल्या ६६० मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पाचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे उर्जा नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिलापूर येथील भूमिपूजन कार्यक्रमात केली. आज इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या भूमिपूजन करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत पत्र दिले. यावेळी प्रकल्प होणार असे आश्वासन उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.
       समीर भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक औष्णिक विद्युत केंद्रासाठी एकलहरे, ता. जि. नाशिक येथे ४७२ हेक्टर जागा संपादीत करून १९७० च्या दशकात १४० मेगावॅट चे दोन संच आणि १९८० च्या दशकात २१० मेगावॅटचे तीन संच कार्यान्वित करण्यात आले. १४० मेगावॅटचे दोन संच दि. ३० जुन २०११ रोजी बंद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी २१० मेगावॅटचे तीन संच कार्यान्वित आहेत. मात्र तरीही या वीजनिर्मिती केंद्राने आतापर्यंत वीजनिर्मितीत सातत्य ठेवून एमईआरसीच्या निकषांचे तंतोतंत पालन करत बचत करून वीजनिर्मितीचे उद्दिष्ट सध्या करत अनेक विक्रम केले आहेत. सध्या कार्यरत असलेल्या तीन संचाचेही आयुर्मान संपत असल्यामुळे सन २०११ मध्ये या ठिकाणी ६६० मेगावॅटच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र नाशिक ऐवजी सदर प्रकल्प डहाणू मध्ये उभारला जाणार आहे असे समजते. वास्तविक कोणताही नवीन प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाचा यक्ष प्रश्न असतो. आणि या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली  जागा एकलहरे येथे उपलब्ध आहे. नवीन भूसंपादनाचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा विरोध किंवा इतर कोणतीही अडचण नाही, उलट या ठिकाणी प्रकल्प व्हावा यासाठी येथील स्थानिक नागरिक शासनाला साकडे घालत आहेत. प्रकल्पासाठी सर्व पायाभुत सुविधा उदा. स्वतंत्र रेल्वे लाईन, उन्हाळ्यात सुद्धा वीज निर्मिती करता येईल एवढे मुबलक पाणी, हजारो मे. टन राखेसाठी सुरक्षित अॅश डॅम, कुशल कामगार, प्रशस्त कामगार वसाहत, दर्जात्मक उत्पादन क्षमता असे असतांनाही प्रकल्प स्थलांतरीत करण्याचे शासनाचे धोरण अन्यायकारक व अव्यवहार्य असल्याचे दिसून येत असून नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये ६६० मेगावॅटचे युनिट उभारण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी समीर भुजबळ यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !