मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या भुजबळांविषयी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाचा भुजबळ समर्थकाकडून जाहीर निषेध ! भाजपाच्या फुटकळ दलालांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे प्रत्युत्तर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपच्या फुटकळ दलालांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये-योगेश निसाळ
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तुषार जगतापांकडून
छगन भुजबळ यांच्याविषयी केलेल्या पत्रकबाजीचा जाहिर निषेध
                                                        
नाशिक, दि.२२ जानेवारी :-स्वतःला मराठा समाजाचा नेता व मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणवणाऱ्या कथित आरोग्यदूत तुषार जगताप यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून चुकीची माहिती पसविण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांचा बोलवता धनी वेगळा असल्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी परिपत्रक काढून आरोप करण्याचा तुषार जगताप यांचा प्रयत्न असून मराठा समाज बांधव अशा पत्रकामुळे भुलणार नाही.भाजपच्या फुटकळ दलालांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस योगेश निसाळ यांनी केली आहे.
        योगेश निसाळ यांनी म्हटले आहे की, छगन भुजबळ हे देशातील बहुजन समाजाचे नेते असून त्यांनी जातीयवादाला कधीच थारा न देता प्रत्येक समाजातील नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या मराठा उमेदवारांसाठी भुजबळ साहेब हे अहोरात्र राज्यभर फिरत आहे.मराठा समाजाच्या उमेदवारांना ओबीसी सह मागासवर्गीय बांधवांची मते मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहे.
          त्यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्याचा विकास करून कायापालट  केला आहे. रस्ते,एअरपोर्ट, पर्यटनाची कामे किंवा विकासाची कामे ही काय त्यांनी कुठली ठराविक जात डोळ्यासमोर ठेऊन केलेली नाही.युती सरकारच्या विरोधात भुजबळ साहेब यांनी आवाज उठवला असल्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. एवढेच नव्हे तर केंद्राच्या आयटी सेलकडून देखील त्यांच्या सभांवर लक्ष ठेवले जात असून सरकारकडून खालच्या पातळीवरील राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये स्वत:ला समाजसेवक म्हणून घेणारे तुषार जगताप नामक व्यक्ती कोणाच्या तरी ओंजळीने पाणी पिऊन बिनबुडाचे आरोप करत आहे.जातीवाद आणि धर्मवाद करून मते मिळवण्याचा धंदा आता बंद करा असे प्रत्युत्तर योगेश  निसाळ यांनी दिले आहे.
       तुषार जगताप यांनी समाजात द्वेष पसरविणारे असे कितीही पत्रके काढून प्रसिद्धी मिळविण्याचा खोटा प्रयत्न केला तरी मराठा समाजातील जनता त्याला बळी पडणार नाही. गेल्या निवडणुकीत जातीयवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र गेल्या पाच वर्षात नागरिकांच्या हाताला कुठलाही विकास लागला नाही.गेल्या निवडणुकीत जातीयवादाच्या घोडचूकीमुळे नाशिक जिल्हा विकासात मागे गेल्याची सर्वांना जाणीव झाली आहे.स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी कथित समाजसेवकांना हाताशी घेऊन जातीयवाद पसरविण्याचा खोटा धंदा केला जातो. मात्र मराठा समाज बांधव सुज्ञ असून ते अशा खोट्या बातम्यांना बळी पडणार नाही असे योगेश निसाळ यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!