पोस्ट्स

गोडसे यांच्या प्रचारार्थ शहरात दुचाकी रॅलीचा झंझावात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
   गोडसे यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीस मोठा प्रतिसाद         नाशिकः लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ  काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो तरुणांनी मोटारसायकलवर स्वार होत गोडसे यांच्या प्रचारात सहभाग घेतला. मोटारसायकलला लावलेले भगवे झेंडे, गळ्यात भगवी मफलर, डोक्यावर भगवी टोपी, मनगटात भगव्या रंगाची पट्टी व खिशाला अडवलेला धनुष्य बाणाचा बिल्ला अशा थाटात शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. तर महायुतीतील रासपाचा पिवळा, रिपाईचा निळा व भाजप-सेनेचा भगवा अशा विविध रंगी झेंड्यानी शहरातील रस्ते सजले होते.         सकाळी नऊच्या सुमारास अशोक स्तंभ येथील ढोल्या गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. रस्त्यात ठिकठिकाणी या रॅलीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. त्या त्या भागात रॅली आल्यावर तेथील तरुण दुचाकीवरस्वार होऊन या रॅलीत सहभागी होत होते. अनेक ठिकाणी उमेदवार  खा. गोडसे यांचे सुवासिनींनी औक्षण केले. महायुतीची ही रॅली रुंग्ठा हायस्कूल

बिनचेहऱ्याची आघाडी पापं करूनही निर्लज्जपणे सामोरे येते, काॅग्रेसचे घोटाळे सुद्धा आदर्श घोटाळे आहेत-उद्धव ठाकरे ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकः  ज्यांनी सत्तर वर्षे देश लुटून खाल्ला, देशातील जनतेला पिळवलं त्या काँग्रेस व राष्ट्रवादीची बिन चेहऱ्याची आघाडी आहे. एवढी पापं करुनही ते पुन्हा निर्लज्जपणाने सामोरे येत आहे. त्यांनी हजारो कोटींचा घोटाळा करुन देशाचा सत्यानाश केला. आम्ही देव, देश व धर्मासाठी एकत्र आलो आहोत. देशाच्या हितासाठी युती केली आहे. ही भगवी वज्रमूठ पक्की असून कोणीही तिला टक्कर देऊ शकणार नाही. इथे इनाम राखणारी माणसं आहेत. एक दिशा आहे एक विचार आहे व एक नेता आहे. काश्मीरमधील ३७० कलम काढणार असून देश द्रोह्यांना फासावर लटकावणार असून आम्ही राममंदीर बांधणारच असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.          नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवर हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी , राज्यमंत्री दादा  भुसे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हा संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, भाजपाचे वरीष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सेनेचे

समीर भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे -- अनिता भामरे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक (प्रतिनिधी) विकसनशील शहरांच्या यादीत असलेले नासिक शहर हरवले, यावर उपाय म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी  केले         विकसनशील शहरांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर असलेले नासिक भाजपा सरकारच्या काळात हरवले आणि विकासात मागे पडले म्हणून नासिक शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे  आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी मतदारांना केले. केवळ मोठमोठ्या घोषणा करून सर्व सामान्य जनतेला फसवून भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मात्र गेल्या पाच वर्षांत ह्या सरकारने कुठल्याही प्रकारचे जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेतले नाही यामुळे जनतेच्या मनात राग आहे. शेतकरी कर्जमाफी नाही, युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, नोटबंदी, अशा विविध कारणांमुळे जनता हवालदिल झाली आहे असे भ

लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड ! गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड                 खा. गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद           नाशिकः  खा. हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांत चांगली कामे केली आहेत. ते सुसंस्कृत, सुस्वभावी, हुशार व चांगली वर्तणूक असलेला विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयात त्यांचा लौकिक आहे. लोकोपयोगी कामांमुळे जनमाणसांत गोडसे यांची प्रतिमा उंचावली असून ते मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम इंजिनिअरींग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यांची महाविद्यालयाशी नाळ जोडली आहे. या महाविद्यालयातील सर्व सेवकवृंद त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहातील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य  व्ही. बी. गायकवाड यांनी केले. प्रचार दौऱ्यानिमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.            प्रारंभी महाविद्यालयाच्यावतीने गोडसे यांचे स्वागत करण्यात आले. गोडसे यांनी माझी उमेदवारी याबाबत प्राध्याकांशी संवाद साधला. त्यानंतर गोडसे यांनी कॉलेज रोडवरील एचपीटी कॉलेजमध्ये जा

तरूणांनो आयुष्यातील अनुपम जोडीदाराच्या शोधात आहात काय ? मग, २९ एप्रिल रोजी मतदान करा ! मोफत मेंबरशीप मिळवून अनुपम जोडीदार निवडा !!! सुवर्ण संधीच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
मतदारांसाठी अनुपम डॉट कॉमतर्फे सुवर्णसंधी मतदान करा...मोफत सदस्यत्व मिळवा  नाशिक - लोकसभेसाठी नाशिकसह मुंबई, ठाणे येथे २९ एप्रिलला मतदान होत आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे तसेच विशेषतः लोकशाही प्रक्रियेत प्रथमच सहभागी होणाऱ्या तरूणाईसाठी म्हणजेच मतदारांकरिता नाशिकच्या प्रख्यात अनुपम डॉट कॉम या विवाह संस्थेतर्फे प्रोत्साहनपर योजना घोषित करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे ,नाशिक सहीत पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अनुपमशादी डाॅट काॅम या अग्रगण्य विवाहसंस्थे तर्फे मतदान करणा-यासांठी एक अफलातून योजना तयार करण्यात आली. यामधुन अनेकांचे लग्न जमणार आहेत. नाशिक,मुंबई व ठाणे येथे दिनांक २९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान आहे. सर्वांनी मतदान करावे असे आवाहन अनुपमशादी डाॅट काॅम तर्फे करण्यात येत आहे. जे मतदार मतदान करतील व  विवाहइच्छुक असतील त्यांना अनुपमशादी तर्फे  रु 1500 ची मेंबरशिप ही थेट मोफत देण्यात येणार आहे. अनुपमशादी डाॅट काॅम तर्फे घेण्यात आलेल्या अनेक विवाहमेळाव्यातुन व www.anupamshaadi.com/  या ऑनलाईन वेबसाईट वरुन हजारोंचे विवाह जुळले आहेत. मतदानाच्या  दिवशी दि. 29  ए

शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांच्याकडून जनतेस सद्वविवेकपणे मतदान करण्याचे आवाहन ! कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला पाठिंब्याचा प्रश्न नाही !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शहर-ए-खतीब यांच्याकडून जनतेस आवाहन ! नासिक ::- शहर-ए-खतीब हे मुस्लीम समुदायाचे सेवक म्हणून कार्य करीत असतात, त्यामुळे राजकीय निवडणुकीत या पदाचा काहीएक संबध  नसतो, त्याचप्रमाने आम्ही कोणत्याही राजकीय पक्षासोबत  कधीच नव्हतो, आजही नाही, आणी भविष्यातही राहणार नाही, आम्ही फक्त आणी फक्त समाजाचे सेवक या नात्याने कार्यरत असतो, मात्र सध्या होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधील निवडणुकीसाठी असलेले बहुतेक उमेदवार आमच्या सदीच्छा व आशिर्वादपर भेटीसाठी येतात याचा अर्थ आम्ही एखाद्या राजकीय पक्षासोबत आहोत असे समजणे गैर आहे. भेटीचा विषय कुण्या राजकीय पक्षाबरोबर वा राजकीय व्यक्तीसोबत जोडून जनतेत चुकीचा संदेश पाठविला जात असेल तर अशा अफवांना समाजाने बळी पडू नये, लक्ष देऊ नये, आपल्या लोकशाही मुल्यांचा हक्क अबाधित ठेऊन सद्विवेक बुद्धीने अंतरात्म्याचा आवाज सांगेल त्या उमेदवाराला मतदान करा. लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा,  भारतीय नागरिक आहोत तर महत्वपूर्ण तथा गंभीरतेने मतदानाचे कार्य प्रत्येकाने पूर्ण करावे, असे आवाहन नासिक शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांनी एका पत्रकाद्वारे

माझ्याविषयी कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्येधाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
माझ्याविषयी  कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्ये धाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ नाशिक, दि.२३ एप्रिल :- माझ्यावर आणि समीर भुजबळ वर केलेले आरोप सर्व खोटे असुन त्याबाबतचा तसा अहवाल न्यायालयाकडुन तर येईल. मग त्यानंतर मात्र माझ्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मी जेल मध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे झालेल्या जाहीर देत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.          ते पुढे म्हणाले की,  प्रत्येकजण स्वत:ला विकासपुरुष, कार्यसम्राट म्हणून घेत असतांना सिन्नर तालुक्यात १० वर्षे आमदारकी काळात तुम्ही  स्वतः काय विकास केला असा सवाल करत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल तर  तो फक्त मी आणि  समीर भुजबळ यांच्या निधीतुन विकास केला आहे असे सांगत एक बस स्टँड बांधुन त्याचे गाळे भाड्याने देऊन किंवा विकुन आपली दुकानदारी केलेली नाही. सिन्नरच्या विकासासाठी समीर भुजबळ यांनी निधी उपलब्ध करुन दिला  आहे.  त्यामुळे कुणीही खोटे बोलु नये असे सांगून कोकाटेवर चांगलेच  तोंडसुख घेतले.            पिंपळगांव येथे झालेल्या प

नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग नाशिक,दि.२३ एप्रिल :- राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ  यांच्या प्रचारार्थ नाशिकरोड विभागात काढण्यात आलेल्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शकडो महिला व तरुण आपल्या  मोटार सायकल घेऊन रॅलीमध्ये सहभागी होत समीर भुजबळ यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन करत होते. त्याअगोदर समीर भुजबळ यांनी सकाळी संभाजी स्टेडीयम  सिडको येथील मॉर्निग वॉक साठी आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.         आज सकाळी नाशिकरोड येथील बिटको चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे जेलरोड, भीम नगर, गारगोटी बंगला,  कॅनॉल रोड,  पवारवाडी,  भगवती लॉन्स,  पंचक गाव, राजराजेश्वरी चौक,  ढिकले मळा,  शिवाजी नगर,  निरगुडे हॉस्पिटल, सैलानी बाबा,  दसक,  सैलानी बाबा, मारुती मंदिरा जवळून उपनगर नाका,  कॅनॉल रोड टाकीवर,  सिन्नर फाटा,  विष्णू नगर, तसेच  एकलहरा रोड,  गोरेवाडी,  ट्रॅक्शन कॉलनी रोड,  पॉलीटेक्निक रोड,  सिन्नर फाटा, चेहड

सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठीसमीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ नाशिक,दि.२३ एप्रिल :- सिन्नर तालुक्यातील बहुतांश गावातील मुख्य पाण्याची आणि शेती समस्या आहे. आगामी काळात सिन्नर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी  केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून आणा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील वावी येथे झालेल्या जाहीर सभेत केले.        यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,  सिन्नर तालुक्याचे सतत दहा वर्षे आमदार म्हणून काम करणार्याह कोकाटेंनी त्यांच्या दहा वर्षांत सिन्नर तालुक्यातील नागरिकांवर अन्यायच केला असून अशा अन्यायकारक आणि नाकर्तेपणाची भुमिका घेणा-या कोकाटेना सिन्नरकरांचा आता काय अचानक पुळका आल्याचे सांगत यावेळी कोकाटेना सिन्नरकर नाकारल्या शिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी  सांगीतले.            यावेळी डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासारखे कर्तबगार नेतृत्व आजच्या घडीला नाशिक जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रातही सापडणार नाही समीर भुजबळ यांच्याकडे प्रगत

उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक येथे सभा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज नाशिक येथे सभा नाशिकः  नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. २४ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व भाजपाचे स्टार प्रचारक तथा उत्तराखंडचे पर्यटन विकास मंत्री सतपालजी महाराज यांची सभा शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे. सभेस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. या सभेत उद्धव ठाकरे आणि सतपालजी महाराज काय मार्गदर्शन करतात याकडे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.        यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन,शिवसेना उपनेते बबनराव घोलप, भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गिते, भाजपाचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर रंजनाताई भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतलताई सांगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रासपाचे जिल्हाध्यक्ष अरुण आव