लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड ! गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड
                खा. गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद
          नाशिकः  खा. हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांत चांगली कामे केली आहेत. ते सुसंस्कृत, सुस्वभावी, हुशार व चांगली वर्तणूक असलेला विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयात त्यांचा लौकिक आहे. लोकोपयोगी कामांमुळे जनमाणसांत गोडसे यांची प्रतिमा उंचावली असून ते मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम इंजिनिअरींग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यांची महाविद्यालयाशी नाळ जोडली आहे. या महाविद्यालयातील सर्व सेवकवृंद त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहातील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य  व्ही. बी. गायकवाड यांनी केले. प्रचार दौऱ्यानिमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
           प्रारंभी महाविद्यालयाच्यावतीने गोडसे यांचे स्वागत करण्यात आले. गोडसे यांनी माझी उमेदवारी याबाबत प्राध्याकांशी संवाद साधला. त्यानंतर गोडसे यांनी कॉलेज रोडवरील एचपीटी कॉलेजमध्ये जात प्राध्यापक व कर्मचाऱ्यांशी हितगुज केले.  लोकसभा मतदार संघात करण्यात आलेल्या विविध विकास कामांची तसेच प्रस्तावित कामांची  माहिती दिली. नाशिक शहर व जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी आपण सतत पाठपुरावा करुन कामे केली आहेत. यापुढेही विकासाचा सिलसिला सुरु ठेवणार आहेत. देशासाठी पंतप्रधान म्हणून मोदींची गरज आहे. मोदी सरकारमुळेच देशाचा विकास होणार असल्याचे आपल्याला भरघोत मते द्या असे आवाहन गोडसे यांनी केले. तत्पूर्वी गोडसे यांनी नाशिक शहरातील गंगापूर रोड व परिसरातील उद्योजक, व्यापारी, कामगार, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षककेतर कर्मचारी आदींच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. या प्रचार दौऱ्यात गोडसे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी डॉ. एस. एन. शिंदे, आय. बी. चव्हाण,  देसले सर, डी. डब्ल्यू. आहेर,  पी. एम. बनकर,स एम. आय. हळदे, प्रशांत कदम, बी. ए. डुंबरे,  एस. डी. रायते,  अमीत मोगल, योगेश हिरे, संजय चव्हाण, संजय करंजकर, कमलेश भोये, नाना काळे, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव