गोडसे यांच्या प्रचारार्थ शहरात दुचाकी रॅलीचा झंझावात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

   गोडसे यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीस मोठा प्रतिसाद
        नाशिकः लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ  काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो तरुणांनी मोटारसायकलवर स्वार होत गोडसे यांच्या प्रचारात सहभाग घेतला. मोटारसायकलला लावलेले भगवे झेंडे, गळ्यात भगवी मफलर, डोक्यावर भगवी टोपी, मनगटात भगव्या रंगाची पट्टी व खिशाला अडवलेला धनुष्य बाणाचा बिल्ला अशा थाटात शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. तर महायुतीतील रासपाचा पिवळा, रिपाईचा निळा व भाजप-सेनेचा भगवा अशा विविध रंगी झेंड्यानी शहरातील रस्ते सजले होते.
        सकाळी नऊच्या सुमारास अशोक स्तंभ येथील ढोल्या गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. रस्त्यात ठिकठिकाणी या रॅलीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. त्या त्या भागात रॅली आल्यावर तेथील तरुण दुचाकीवरस्वार होऊन या रॅलीत सहभागी होत होते. अनेक ठिकाणी उमेदवार  खा. गोडसे यांचे सुवासिनींनी औक्षण केले. महायुतीची ही रॅली रुंग्ठा हायस्कूल, सिद्धेश्वर मंदीर, बालाजी विहार, सी. पी. ऑफिस, ठाकरे बंगला,जुनी पंडीत कॉलनी, बोहरा नर्सरी, नवीन पंडित कॉलनी, रमन चौक, टिळकवाडी, कस्तुरबा नगर, राका कॉलनी, कुलकर्णी गार्डन, कॅनडा कॉर्नर, अखिल भारतीय ब्राम्हण मध्यवर्ती संस्था, सिध्दार्थ नगर, कृषीनगर, पारिजात नगर,महात्मा नगर, आकाशवाणी, डी. के. नगर, तुळजा भवानीनगर, थत्ते नगर फिरवून प्रचार करण्यात आल. चोपडा लॉन्समार्गे आ. देवयानी फरांदे यांच्या निवासस्थान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत आमदार देवयानी फरांदे, अजय बोरस्ते, महापालिका स्थायी समितीच्या हिमगौरी आडके, विनायक पांडे, योगेश हिरे, सुरेशअण्णा पाटील, संजय चव्हाण, नाना काळे, राजेंद्र देसाई,  प्रशांत आव्हाड, संजय चिंचोरे आदींसह सेना-भाजप, रिपाइं, रासप व शिवसंग्राम महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
                                    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !