पोस्ट्स

सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी !!              नासिक::- आपल्या 'व्यवस्थेतच ' भयानक दोष आहे. मराठा समाजासह धनगर ,आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत ? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे पाणी का गेलं नाही ? त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही ? असे अनेक प्रश्न राज्या समोर आ वासून उभे आहेत.आणि दुसऱ्या बाजूला या समस्यांना सामोरे जात असताना पर्याय मिळत नसल्याने या प्रत्येक समाजातील घटक जीवन संपविण्याचा निर्णय घेत गळ्याला फास लावून घेत आहे.एकामागून एक माणूस अशा पध्दतीने स्वतःला संपवू लागला तर शासन नावाची व्यवस्था प्रेतांवर राज्य करणार आहे का? अशा ओसाड मनोवृत्तीचा कारभार सुरू असेल तर आपल्या सर्वांना आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,आपण हा सारा उपद्व्याप का आणि कुणासाठी करतो आहोत? म्हणूनच समाजाच्या पदरात त्याच्या हक्काचे योग्य दान टाकण्याचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.पहिली पायरी म्हणून सध्या ऐरणीवर असलेला मराठा, धनगर,  मुस्लिम आर

डॉ. भारती पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारती पवार यांचा दि.22 जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .        सध्या दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असताना मु ख्य मंत्र्यांनी अधिवे शन सं पल्यानंतर डॉ. भारती पवार यांना मुंबईत सत्कारासाठी निमंत्रित केले होते, दिं डो री लोकसभा मतदारसंघा तून डॉ. पवार या पही ल्या महिला खासदा र व मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने त्यांचा सन्मानाने सत्कार सोहळा भाजपा महाराष्ट्र प्र देश कार्याल यात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

योग विद्याधाम यांच्यावतीनेयोग दिनानिमित्त (२१ जून) मोफत सामुहिक योग साधना व रक्तदान शिबीर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
योग विद्याधाम ओंकार नगर नाशिक यांच्यावतीने योग दिनानिमित्त मोफत ‘ सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबीर’ नाशिक,दि.२० जून :- योगविद्याधाम ओंकार नगर तसेच अत्रेयनंदन सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने (२१ जून) जागतिक योगदिनाचे औचित्य साधून माऊली लॉन्स, कामटवाडे सिडको नाशिक येथे ‘सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलगुरू डॉ.विश्वासराव मंडलिक, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित राहणार आहे. या सामुहिक योग साधना व रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन योग विद्याधामचे नाशिकचे अध्यक्ष मनोहर कानडे, उपाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पुरी, कार्यवाहक अॅड. अमरजितसिंग गरेवाल, सिडको विभाग अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष संजय जाधव, कार्यवाहक शंकरराव बोराटे, योगशिक्षिका कांचन खाडे यांनी केले आहे. योग विद्याधाम यांच्यावतीने निरोगी आयुष्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार केला जात असून त्यांच्याकडून वर्षभर विविध योग वर्गाचे आयोजन केले जाते. नाशिक शहरात प्रकल्प प्रमुख व सहप्रकल्प प्र

पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत छावा क्रांतीवीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, रूग्णवाहिका यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या शुभहस्ते उद्घाटन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा क्रांती वीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय सेवा वारकऱ्यांच्या चरणी रूजू नाशिक::-छावा क्रांतीविर सेनेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकर्स , रूग्णवाहीका , औषधं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा  आज बुधवार दि.१९ जून रोजी रूजू केली. या सेवेला युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले (खासदार)  यांच्या विशेष प्रेरणेने ही सेवा रूजू केल्याचे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व प्रदेश संघटक नितीन सातपुते यांनी सांगीतले.             छत्रपतींनी वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याला अभय दिले, वारकऱ्यांची सेवा केली त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांचे पाईक म्हणून छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने ही सेवा पुरवली जाते. आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर व सहकाऱ्यांचे पथक व सोबत विविध आजारांवरील गोळ्या औषधे आदींचा पुरवठा करून आज नाशिकमध्ये दिंडी सोहळ्याचे स्वागत करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ.न

२१ जून-जागतिक योगदिन, योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे--अमृता वसंत बोरसे  (योगशिक्षिका)!! सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून जरूर वाचा व आपल्या स्नेहीजनांच्या माहीतीसाठी लिंक शेअर करा !!!

इमेज
योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.          योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”         महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्य

महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे ! पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी ९५०० वह्यांचे मोफत वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक व स्वयंसेवी संस्था यांचे वतीने इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ९५०० वह्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम शासकीय कन्या शाळा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता. एक वही मोलाची, सावित्रीच्या लेकीची हे ब्रीद वाक्य घेऊन औषध निर्माण अधिकारी संघटना गत पाच वर्षापासून अखंडपणे या कार्यक्रमाचे नियमित प्रमाणे आयोजन करत आहे. मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली  तसेच अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा रत्नाकर पवार, उपशिक्षण अधिकारी अनिल शहारे यांचे हस्ते पार पडला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेवग्याच्या झाडाचे रोपटे देऊन करण्यात आले.                                        शीतल सांगळे यांनी आपल्या मनोगतात नमुद केले की, नाशिक जिल्हा परिषदेची पुरातन काळातील नाशिक शहरातील शासकिय कन्या विद्यालय ही मुलींची एकमेव शाळा असून या शाळेत गोरगरिब कुटूंबातील नाशिक शहरातील मुल

शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक :  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये  आज शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडींमध्येदेखील नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सलग दुस-या वर्षी नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला असून ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली. शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी नाशिक तालुकयातील सावरगाव, गंगावरे, मुंगसरे येथील शाळा व अंगणवाडींना भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात ११