नाशिक जिल्हयाने राबविलेल्या उपक्रमांची राज्यभरात अंमलबाजावणी करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणार- आ. विवेक पंडित !!! आदिवासी क्षेत्रातील शंभर टक्के जागा भरण्याची डॉ.नरेश गिते यांनी मांडली सूचना !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक – नाशिक जिल्हयाच्या दौ-यावर आलेल्या राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीने आज गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेवून जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतूक करतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केलेल्या विविध सुचनांबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. आदिवासी क्षेत्रातील राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती गठीत केली आहे. आमदार विवेक पंडीत यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आज नाशिक जिल्हयास भेट दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध विभागांमार्फत आदिवासी भागात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. आढावा घेतानाच आदिवासी क्षेत्रासाठी योजना राबविताना काही शिफारशी असल्यास याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आदिवासी क्षेत्रातील १०० टक्के जागा भरण्याची सुचना केली. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने