शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक :  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये  आज शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडींमध्येदेखील नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सलग दुस-या वर्षी नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला असून ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.
शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी नाशिक तालुकयातील सावरगाव, गंगावरे, मुंगसरे येथील शाळा व अंगणवाडींना भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत असून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, मोफत पाठ्यपुस्तके वितरण नियोजन, शाळाबाह्ण मुलांच्या भेटी, गाव दवंडी, मशाल फेरी आदि उपक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यातील ग्रामीण भागात वातावरण निर्मिती करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।