पोस्ट्स

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता ! एस. भुवनेश्वरी यांच्या मान्यतेने डॉ.दावल साळवेंमार्फत उपोषणाची सांगता !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता दिली !                   नाशिक::-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदाच्या सन२००६ते२०१० या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १०% आरक्षण अंतर्गत एकूण ८ प्रलंबित आरोग्य सेवक पदी भरावयाच्या आरक्षित पदांच्या नियुक्ती मिळणे करिता वंचित ग्रामपंचायत कर्मचारी अंबादास जेजुरकर व संजय विसपुते यांनी नाशिक जिल्ह्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे व राजू देसले यांचे नेतृत्वाखाली दिनांक ६/८/२०१९ पासून सुरू  केलेले आमरण व साखळी उपोषण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती एस. भुवनेश्वरी यांनी उपोणार्थीसह इतर वंचित कर्मचार्यांना गेली ५ वर्षां पासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सेवक  पदाच्या नियुक्ती देण्यास मान्यता दिल्यामुळे सुरु असलेले उपोषण आज दि.९/८/२०१९ रोजी मागे घेण्यात आले. उपोषणाची सांगता करणेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. साळवे , सहाय्यक प्रशासन अधिकारी जीभाऊ शेवाळे, अनिल गीते व कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनवणे उपस्थित

जलप्रलयच ! बाकी काही नाही ! मदत मागायची वेळ येण्याआधीच सामाजिक जाणीवेतून मदत करायला काय हरकत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जलप्रलयच !  बाकी काही नाही ! कोल्हापूर::- कोल्हापूर सांगली ला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे.  महाजनादेश यात्रा सोडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे सह अनेक राजकीय नेते कोल्हापूर वासियांना धीर देण्यासाठी पोहोचले आहेत, स्वता छत्रपती संभाजी राजे बोटीच्या माध्यमातून पुरात व जलप्रलयात अडकलेल्यांना बाहेर काढीत आहेत, सोशल मिडीयावर तसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल,          कोल्हापूर शहर १००% या प्रलयाचा सामना करीत आहे, ५०% शहराला हानी पोहोचली असून  गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत, बाजारपेठेतील सर्व मालाचे नुकसान झाले आहे. रोज लागणाऱ्या अन्न धान्य, दूध व जीवनावश्यक वस्तू मिळेनासे झाले आहे, औषधे व वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे, या जलप्रलयापासून निर्माण झालेली परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे. आज कोल्हापूर सांगली वासीयांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे, काही तासांपूर्वी सांगलीत बोट उलटून दहा लोकांना जलसमाधी मिळाली आहे, आपल्याच बांधवांवर असे अस्मानी संकट

लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र !        राज्य सरकार व केंद्र सरकार केवळ अधिस्वीकृती पत्रिका धारक असलेल्या पत्रकारांना अधिकृत पत्रकार समजते व तशी शासन दरबारी नोंदणी केलेली असते अश्या अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळतो इतर पत्रकारांना लाभ मिळत नाही हे सरकारचे धोरण चुकीचे असून इतर हजारो पत्रकारांवर अन्याय होत असून महाराष्ट्र मध्ये शहरी व ग्रामीण भागातील हजारो पत्रकार जीवावर जीवघेणी जोखीम पत्करून अल्प मानधनावर विविध चॅनल्स ,दैनिके, सप्ताहिके युट्यूब चॅनल वेब पोर्टल, पाक्षिक, मासिके मध्ये काम करत आहेत त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या जाचक अटी मुळे अधिस्वीकृती पत्रिका मिळत नसल्याने त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार पत्रकार म्हणून मान्यता देत नसल्याने अश्या गरीब वंचित पत्रकारांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन पत्रकार सुरक्षा समितीची राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी करावी व त्यांना पत्रकारांसाठी असलेली यो

८ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन ! १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या देण्यात येणार !! मोहीमेचा फायदा घेण्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
           नासिक::- जिल्हा परिषद आरोग्य विभागा व महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, यांच्या सहभागाने येत्या ८ ऑगस्ट  रोजी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व नगरपालिका क्षेत्रात सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळा या ठिकाणी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८% मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवीजंतां पासून धोका आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन करण्यात येते, या दिवशी १ते १९ वर्षे वयोगटातील तील सर्व मुला-मुलींना जवळच्या सरकारी शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येते  तसेच या मोहिमे पासून वंचित राहिलेल्या मुलांना दिनांक १६ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे, यामध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात १ ते २ वयोगटातील ५,१२,०४३ लाभार्थी बालके असून व २ ते १९ वयोगटातील ११,६७,००७ लाभार्थी बालके आहेत, एकूण १२,१८,२५० बालकांना त्याचा लाभ दिला जाणार आहे .या कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे  २९ जुलै रोजी समन्वय स

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचे शुभहस्ते करण्यात आले ! जन्मकहाणी पुस्तकाचे प्रकाशन ! शहरी भागातील नव्या पिढीला ग्रामीण एकत्रित कुटुंब पद्धत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असे पुस्तक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक::- जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शीतल उदय सांगळे यांचे शुभहस्ते तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांचे अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.              कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या कामकाजाचा लेखा जोखा नमूद करुन संस्था स्वमालकीच्या वास्तुत स्थानापन्न होत असल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे नमुद केले. कार्यक्रमात जी.पी. खैरनार यांनी कौटुंबिक कहाणी स्वरुपात जन्मानंतरची ज्ञात असलेली "जन्म कहाणी"  या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा सौ. शीतल उदय सांगळे व उपस्थित मान्यवर यांचे शुभ हस्ते करण्यात आला.             या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शितलताई उदय सांगळे यांनी आरोग्य कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व सभासद यांनी थोड्याच अवधीत संस्थ

आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! ञ्यंबकेश्वर::-तालुक्यातील वाढोली येथील आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने गळक्या छतातून जलधारा  येत असल्याने उपकेंद्रात पाणी साचले आहे, यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन ही उपकेंद्राला दुरूस्ती निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे. वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने त्यावेळी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत असून उपकेंद्र सोय नसुन खोळंबा झाला आहे.त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रूग्नांना उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी,खोकला,ताप यांचे रूग्ण आहेत. त्यांना खाजगी दवाखान्याचा उपचार घ्यावा लागत असल्याने लाखो रुपयांचे उपकेंद्र बिनकामाची वास्तू होऊ पाहते आहे.  उपकेंद्र  दुरुस्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी यांच्याकडून  वारंवार करण्यात आ

न्यूज मसाला एक्सक्ल्युझिव्ह! आज नवनिर्वाचित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी "त्या" रस्त्याची माहिती घेणार ! १ आॅगस्ट रोजी केला जातेगांवचा दौरा !! प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना जनसंपर्काच्या माध्यमातून पोहचविली जाणार- एस. भुवनेश्वरी,मुकाअ,जिप. !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक ::- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी १ आॅगस्ट रोजी जातेगांव चा दौरा करून आपल्या कार्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात केली. सध्या कार्यालयीन कामकाजास व फाईलींचा स्वअभ्यासाबरोबरच निपटारा करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे, लवकरच जिल्ह्यातील पंचायत समित्या व गावांना भेटी देण्याचे व तेथील अडचणी समजून घेत दूर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे न्यूज मसालाशी बोलताना सदर माहिती दिली.                 प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना मिळावी,  यांसाठी जनसंपर्काच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.            जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर व जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा या रस्त्याच्या चौकशी ची मागणी केली आहे, सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने की जिल्हा परिषदेने तयार केला आहे ? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कोण ?, बील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे की जिल्हा पर