जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचे शुभहस्ते करण्यात आले ! जन्मकहाणी पुस्तकाचे प्रकाशन ! शहरी भागातील नव्या पिढीला ग्रामीण एकत्रित कुटुंब पद्धत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असे पुस्तक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक::- जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शीतल उदय सांगळे यांचे शुभहस्ते तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांचे अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
             कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या कामकाजाचा लेखा जोखा नमूद करुन संस्था स्वमालकीच्या वास्तुत स्थानापन्न होत असल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे नमुद केले. कार्यक्रमात जी.पी. खैरनार यांनी कौटुंबिक कहाणी स्वरुपात जन्मानंतरची ज्ञात असलेली "जन्म कहाणी"  या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा सौ. शीतल उदय सांगळे व उपस्थित मान्यवर यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
            या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शितलताई उदय सांगळे यांनी आरोग्य कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व सभासद यांनी थोड्याच अवधीत संस्थेचा कारभार चिकाटीने करुन उपलब्ध नफ्यातुन स्वमालकीची वास्तु खरेदी केली त्याबद्दल अभिनंदन केले. सहकारी संस्था उभ्या करुन नुसते कर्ज वाटप न करता संस्थेचे सभासद व सभासद पाल्य यांच्यासाठी गुणगौरव समारंभ यांसह रुपये दोन लक्ष रकमेपर्यंत विमा सुरक्षा कवच या योजनांसह विविध योजना यांची अंमलबजावणी संस्थेचे संचालक मंडळ करत आहे ही बाब निश्चितच गौरवास्पद गोष्ट असल्याचे नमूद केले. जी.पी.खैरनार यांनी त्यांचे जन्मानंतरची जन्म कहाणी या पुस्तक रुपी लिखाणात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एकत्र कुटुंब पद्धत, ग्रामीण ढंगातील विवाह सोहळा, त्या विवाह सोहळ्यात गायली जाणारी ग्रामीण ढंगातील गाणी, पाणी शेंदण्याचे मोट व त्यावरील गाणी, शेतकरी कुटुंबात दिवाळीची गायली जाणारी देव गाणी लिखाण स्वरुपात सादर करुन सण १९७१ ते १९९० च्या द्विदशकातील ग्रामीण भागाचे हुबेहूब चित्र रेखाटन शब्द रुपात केले असल्याचे नमुद केले.
                 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी नमुद केले की, नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वाटचाल चांगल्या नेतृत्वामुळे प्रगती पथावर असल्याने संस्थेने असेच संस्था सभासद यांचेसाठी कामकाज करत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जी.पी. खैरनार यांचे जन्मानंतरची ज्ञात "जन्म कहाणी" हे पुस्तक वाचुन स्वतःचे बालपण तथा ग्रामीण भागातील स्वतःचा भुतकाळात गेल्याचा भास होतो, असे नमुद केले. खैरनार यांनी असे सामाजिक व इतर लिखाण कायम करुन समाजास उपलब्ध करुन घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे संचालक मधुकर आढाव यांनी संचालकीय मनोगतात संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर केला.
       उपस्थित गुणवंत सभासद पाल्य, सेवानिवृत्त सभासद यांचा सन्मान स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन करण्यात आला. 
              या कार्यक्रम प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शीतलताई उदय सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी, संस्थेचे चेअरमन जी.पी. खैरनार, उपाध्यक्ष गोरक्षनाथ लोहकरे, सचिव प्रशांत रोकडे, संचालक सर्वश्री फैय्याज खान, मधुकर आढाव, जयवंत सोनवणे, विजय देवरे, जयवंत सूर्यवंशी, संजय पगार, तुषार पगारे, विजय सोपे, श्रीकांत अहिरे, सुनील जगताप,  संचालिका सुलोचना भामरे, सोनाली तुसे,  व्यवस्थापक रामदास वडनेरे,सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचे चेअरमन विजय हळदे, नर्सेस संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष सौ. शोभा खैरनार, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विक्रम पिंगळे, संचालक पंडित कट्यारे, पांडुरंग वाजे, किशोर वारे, रवींद्र थेटे, रवींद्र देसाई, अबू शेख, प्रशांत केळकर, अजित आव्हाड, प्रशांत गोवर्धने, गुणवंत सभासद तथा सभासद पाल्य व सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जी.पी. खैरणार यांनी केले तर सूत्रसंचालन गरड यांनी केले. उपस्थितांचे आभार पतसंस्थेचे संचालक श्रीकांत अहिरे यांनी मानले.
 (जी.पी.खैरनार यांनी लिहिलेले पुस्तक हे आजच्या शहरी भागात वास्तव्यास असलेल्या नव्या पिढीसाठी ग्रामीण एकत्र कुटुंब पद्धत अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होईल. जीपींनी यापुढेही असेच लिखाण करुन साहित्य रुपात समाजास उपलब्ध करुन घ्यावे ही अपेक्षा व्यक्त करते. - सौ.शीतल उदय सांगळे)
(ग्रामीण एकत्र कुटुंब पद्धतीत जन्म घेऊन ग्रामीण भागातील रुढी, परंपरा नव्या पिढीसाठी इतिहास म्हणुन सादर करताना कौटुंबिक प्रेम, जिव्हाळा कायम राहण्यासाठी प्रेरणादायी होईल , ही अपेक्षा ! - जी.पी. खैरनार)
टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!