जलप्रलयच ! बाकी काही नाही ! मदत मागायची वेळ येण्याआधीच सामाजिक जाणीवेतून मदत करायला काय हरकत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

जलप्रलयच !  बाकी काही नाही !
कोल्हापूर::- कोल्हापूर सांगली ला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे.  महाजनादेश यात्रा सोडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे सह अनेक राजकीय नेते कोल्हापूर वासियांना धीर देण्यासाठी पोहोचले आहेत, स्वता छत्रपती संभाजी राजे बोटीच्या माध्यमातून पुरात व जलप्रलयात अडकलेल्यांना बाहेर काढीत आहेत, सोशल मिडीयावर तसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल,
         कोल्हापूर शहर १००% या प्रलयाचा सामना करीत आहे, ५०% शहराला हानी पोहोचली असून  गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत, बाजारपेठेतील सर्व मालाचे नुकसान झाले आहे. रोज लागणाऱ्या अन्न धान्य, दूध व जीवनावश्यक वस्तू मिळेनासे झाले आहे, औषधे व वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे, या जलप्रलयापासून निर्माण झालेली परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे. आज कोल्हापूर सांगली वासीयांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे, काही तासांपूर्वी सांगलीत बोट उलटून दहा लोकांना जलसमाधी मिळाली आहे, आपल्याच बांधवांवर असे अस्मानी संकट आले आहे, प्रत्येकाने आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत करता येईल ती योग्य मार्गाने करायला हवी असे आवाहन न्यूज मसाला कडून करण्यात येत आहे. मदत करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती माहिती घेऊन त्याप्रमाणे आपण आपले कर्तव्य पार पाडावे, न्यूज मसाला कडे किंवा वैयक्तिक पातळीवर कुणी मदत मागितली तर देऊ नका, आपण फक्त प्रशासनाला सहकार्य करावे, प्रशासनाकडे आपत्कालीन व्यवस्थापन आहे, मानवी शक्तीच्या मदतीसाठी स्वता पुढाकार घेऊन योग्य स्थळी गरज लक्षात घेऊन तेथे पोहचून प्रशासनाला मदत करायला काय हरकत.
   "म्रुत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!