पोस्ट्स

बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं ! जुन्या काळातील फंडे क्रमांक-१,. माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या मित्रांना शेअर करा !!!

साप्ताहीक न्यूज मसाला, नासिक, जुन्या काळातील फंडे, क्रमांक-१ "बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं !"                बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडत असेल व रडणे थांबवायचे असेल तर काही उपाय तुम्हाला ऐनवेळी मदत करु शकतात ! लहान मुलांना आपल्याला काय होत आहे हे सांगता येत नाही. ती फक्त रडून आणि चिडून आपला त्रास व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाही. यामुळे बाळाचा स्वभाव चिडका होत जातो व बाळ जसजसे मोठे होते तेव्हा त्याच्या मेंदूवर ताण पडत जातो व एका विशिष्ट बुद्ध्यांकाजवळ बाळ येऊन ठेपते. बाळाने दिवसात काही प्रमाणात रडणे हेही शारीरिक बळकटी साठी गरजेचे आहे. मग प्रश्र्न निर्माण होतो की बाळाला रडू द्यावे की नाही ? यावर मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून पालकांनीच ठरवावे की नक्की बाळ का रडत आहे ? त्याची रडणे हि एकमेव भाषा असून तिचा अर्थ पालकांनी समजून घेतला तर कधी कधी बाळाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करणेही उचित ठरते. मात्र कारणमीमांसा करताना गल्लत होऊ शकते असं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळाचे पाय उलटे धरुन हलविल्यास (याला ग्रामीण भाषेत "हासली भरणे" म्हणतात), काही सेकंदात ब

जेव्हा झोपडीतील गरीबाच्या मुलाची आमदारकीसाठी मान्यवरांकडून शिफारस केली जाते ! तिकीट घोषित करायला अजून थोडा अवकाश असला तरी मी तरी आनंदाने या मुलासाठी सकारात्मक असेल-चंद्रकांत पाटील !! खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर वाचा, त्याच कर्तृत्ववान , जिगरबाज मुलाच्या शब्दांत !!!

इमेज
तुळजापूर विधानसभा एक पाऊल अजून पुढे! योगेश केदार यांच्याच शब्दांत ! ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,                चंद्रकांत दादांची आज मुंबईमध्ये भेट झाली. छत्रपती संभाजीराजेंनी माझ्या उमेदवारीसाठी मोहीमच उघडली आहे. श्रीमंतासाठी तर कुणीही शिफारस करेल, पण एक झोपडीत राहणाऱ्या गरीबाच्या मुलासाठी आमदारकीची शिफारस मी करतोय. दादा महाराष्ट्रामध्ये हक्काने मी योगेश केदार चीच सीट मागतोय. मुख्यमंत्री देवेंद्रजीना सुद्धा मी बोललोय. आज पर्यंत मी भाजप कडे काहीच मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही. अश्याप्रकारे,  माझ्या विषयी राजे आणि दादा जवळपास अर्धा तास चर्चा करत होते.           राजेंनी दादांना सांगितलं की, दिल्लीमध्ये राहून खूप मोठमोठी कामे योगेश नी केली आहेत. जिल्ह्यासाठी सुद्धा अनेक मोठे प्रकल्प घेऊन जाण्यासाठी त्याची धडपड चालू असते. रेल्वे , पासपोर्ट कार्यालय, पाईपलाईन ने गॅस पुरवठा योजना, २१ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, तुळजाभवानी मंदिरासाठी १.५० कोटी रुपये केंद्रशासनाकडून मंजूर(तत्वतः) केले आहेत.          अनेक देशांच्या राजदूतांसोबत वैयक्तिक संबंध प्रस्थापित याने केले आहेत. प्रशासकीय अनुभव

नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते तर सरचिटणीसपदी दिलीप निकम ! जाहिरात संस्थांच्या संघटनेची बिनविरोध निवडणूक पार पडली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते  तर सरचिटणीसपदी दिलीप निकम नाशिक- दि .25- येथील जाहिरात संस्थांची संघटना नाशिक ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा )च्या नूतन कार्यकारिणिची निवड करण्यात आली असून , अध्यक्षपदी  श्री   ऍडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन गीते पाटील  यांची तर सरचिटणीसपदी वत्सदा ऍडव्हर्टायझिंगचे संचालक दिलीप निकम  यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल राजभोज येथे संपन्न झाली. मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. भाऊसाहेब  गंभीरे  यांनी काम पाहिले. त्यांना संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे व अमोल कुलकर्णी यांनी साह्य केले.  अध्यक्षपदासाठी सचिन गीते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . त्यावर कोणीही विरोध न दर्शवता गीते यांच्या निवडीला एकमताने  संमती देण्यात आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घोषित केले तर दिलीप निकम यांचे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले . उपाध्यक्ष पदासाठी श्रीशुभ अँड चे महेश कलंत्री यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली . नूतन अध्यक्

राजलक्ष्मी अर्बन को. आॅप. बॅंक लि. नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ! आमदार डॉ राहुल आहेर यांनी वाढदिवस साजरा न करता होणा-या सर्व खर्चाची रक्कम कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in.

इमेज
नासिक (दि.२४)::- राजलक्ष्मी अर्बन को.आॅप. बॅंक लि.नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.               २२ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास कायम करून ३१ मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक अहवालास मंजूरी देण्यात आली. नफा वाटणीस व लाभांश वाटप, मागीलवर्षी झालेला जादा खर्च व पुढील खर्चाचे अंदाजपत्रक, तसेच एकरकमी परतफेड करणे योजना स्विकारलेल्या व त्याअंतर्गत बंद झालेल्या थकीत कर्ज खात्यांची माहिती ची नोंद घेऊन मंजूरी देण्यात आली, आयत्या वेळी आलेल्या विषयांवर   चर्चा करण्यात आली.            सभा सुरू होण्यापूर्वी आजच भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटलींचे निधन व मागील वर्षभरात बॅंकेशी निगडित, हितचिंतक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञात-अज्ञात व्यक्तिंचे निधन व सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सभेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली.            बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांचा १६ आॅगस्ट रोजी असलेला वाढदिवस साजरा न करता होणाऱ्या सर्व खर्चाची रक्क

अल्ट्रा मॉड्यूलर गेम चेंजर मानल्या जाणाऱ्या ट्रायबरचा २८ ऑगस्ट रोजी शुभारंभ ! फक्त ११००० रुपये भरून नोंदणी करता येईल ! नाबाद लवचिकता. रेनो ट्रायबर हा खरा गेम चेंजर असून ते एक आधुनिक, प्रशस्त तरीही आटोपशीर, फारच संक्षिप्त, इंधन-स्नेही वाहन आहे - सीईओ वेंकटरामण मामील्लपले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल !!!!!

इमेज
रेनो ट्रायबरच्या नोंदणीला १७ ऑगस्टपासून सुरुवात,      अल्ट्रा मॉड्यूलर गेम चेंजर मानल्या जाणाऱ्या ट्रायबरचा २८ ऑगस्ट रोजी शुभारंभ !             नवी दिल्ली(प्रतिनिधी)::- रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून, त्यांनी त्यांचे नवीन उत्पादन रेनो ट्रायबरची नोंदणी खुली झाल्याची घोषणा केली आहे. २८ ऑगस्टपासून रेनो ट्रायबरचा बाजारात शुभारंभ होणार आहे. रेनो ट्रायबर ही भारत आणि फ्रान्समधील रेनो संघादरम्यान सामर्थ्य आणि सहकार्याचे प्रदर्शन करते. हे जगातील पहिले वाहन आहे, जे खासकरून भारतीय बाजारपेठेला समोर ठेवून  बनविण्यात आले. चेन्नई येथील निर्मिती सुविधा केंद्रात नवीन कारची निर्मिती याअगोदरच सुरू झाली आहे व देशातील रेनोच्या ३५० हून अधिक विक्रेत्यांकडे, सर्वात मोठ्या संपर्कजाळ्यापर्यंत वाहने लवकरच पोहोचतील.  रेनो ट्रायबरची नोंदणी १७ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. https://triber.renault.co.in या वेबसाईटवरून किंवा रेनोच्या अधिकृत विक्रेत्याकडे  रु.११०००/- टोकन रक्कम भरून ग्राहकांना रेनो ट्रायबरची नोंदणी करता येत आहे. “रेनो ग्रुपकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. भारतात विस्तार

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचे मानधन व अतिथ्य भत्त्यात वाढ करण्यात आली असल्याबाबत काल शासन निर्णय निर्गमित करण्यात आला !! सविस्तर माहितीसाठी शासन निर्णय पहावा , बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५, कलम ६१(१) मधील तरतूदीनुसार शासन वेळोवेळी निर्धारीत करेल, इतके मानधन व अतिथ्य भत्ता देय आहे. संदर्भात शासन निर्णयान्वये राज्यातील नगरपरिषदांमधील नगराध्यक्षांचे मानधन व अतिथ्य भत्ता निर्धारीत करण्यात आला होता. नगराध्यक्षांची जबाबदारी, कायमस्वरूप विचारात घेऊन, सदर मर्यादा वाढविण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. नगराध्यक्षांना मानधन व अतिथ्य भत्त्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णयानुसार मानधन व आतिथ्य भत्ता देय राहील. दरमहा जास्तीत जास्त मानधन व दरवर्षी जास्तीत जास्त अतिथ्य भत्ता खालीलप्रमाणे देण्यात येणार. (क्रमाने--नगरपरिषद/नगरपंचायत वर्ग, मानधन, आतिथ्य भत्ता ) अ वर्ग रू.25,000/.        रू 36,000/- ब वर्ग   रू.20,000/-       रू.24,000/- क वर्ग   रू.15,000/-.      रू.18,000/ याप्रमाणे मंजूरी देण्यात आली.

जायभावे कुटुंबाची लक्ष्मी तथा लक्ष्मीआई काळाच्या पडद्याआड !! लक्ष्मीआई , जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक जी. पी. खैरनार यांच्या लेखणीतून उतरलेली एक भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
जायभावे कुटुंबाची "लक्ष्मी" तथा "लक्ष्मीआई" पडद्या आड !          नाशिक::- शहरातील मोरवाडी येथील रहिवासी असलेले स्व. सुखदेव भावराव जायभावे यांच्या पत्नी गं. भा. लक्ष्मीबाई सुखदेव जायभावे यांचे मंगळवार दिनांक २०ऑगष्ट, २०१९ रोजी रात्री १०.४५ वाजता दुःखद निधन झाले. नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था , नाशिकचे सहचिटनीस अॅड. श्री. तानाजी जायभावे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदाम नागरे यांच्या गं. भा. लक्ष्मीबाई सुखदेव जायभावे या मातोश्री होत ! लक्ष्मीआई यांना सात मुले व एक मुलगी असा परिवार होता. लक्ष्मीआई यांचे माहेर नाशिक जवळील पिंपळगाव बाहुला येथील गामने कुटुंबातील. पिंपळगाव येथील गामने कुटुंब तसे सांप्रदायिक पंथाचे. त्यामुळे आई लक्ष्मीआई यांच्या संपूर्ण आयुष्यात सांप्रदायिक पंथाच्या निस्सीम भक्तीच्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कौटुंबिक जीवनात अनुभवास मिळाला आहे. आई लक्ष्मीआई यांचा पेहराव हा एखाद्या ऐटबाज स्त्रीचा होता. सडपातळ शरीरयष्टी, गोरा रंग, लांब नाक, अजाण बाहु व बोली शब्दात आद

१) वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात !! २) शाखा अभियंता निलंबित !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल www.newsmasala.in

इमेज
१) वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ! ************************ २) शाखा अभियंता निलंबित !        नासिक::- उप जिल्हा रुग्णालय मनमाड येथील वैद्यकीय अधिकारी व कक्ष सहाय्यक यांना आज लाचलुचपत विभागाने  लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.          तक्रादाराच्या बहिणीचे सिझेरीन करण्यात आले होते त्याबदल्यात ४०००/- रुपये लाच मागितली होती, तडजोडीअंती रुपये ३०००/-  स्विकारतांना उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील सुभाषराव पोतदार व उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील कक्ष सहाय्यक प्रविण निलकंठ राठोड या दोन्हीना पंच साक्षीदारांसमक्ष रुपये ३०००/- लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक यांनी रंगेहाथ पकडले. *****************************************     शाखा अ भियंता इंगळे निलं बित             नासिक::- गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर बोरपाडा रस्त्याच्या कामाचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला होता त्यानुसार आज जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग शाखा अभियंता इंगळे य

धर्म आणि राजकारणाच्या शुध्दीसोबत महिला सक्षमीकरण चळवळीत शांतीगीरीजींचे मोलाचे योगदान ! म्हाळसामाता ध्वजारोहण सोहळ्यात छ. संभाजीराजेंचे गौरवोद्गार !! रक्षाबंधनानिमित्त महिलांना वस्रदान व कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांना आर्थिक तसेच वस्तूरुपाने मदतीचा हात, जयबाबाजी परीवार व छावा क्रांतीवीर सेनेचा सामाजिक उपक्रम !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
धर्म आणि राजकारणाच्या शुध्दीसोबत महिला सक्षमीकरण चळवळीत  शांतीगीरीजींचे मोलाचे योगदान ! म्हाळसामाता ध्वजारोहण सोहळ्यात छ.संभाजीराजेंचे गौरवोद्गार            ओझर (प्रतिनिधी ) :- निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सर्वांगाने  प्रयत्न केले आहेत. आणि आजही अखंड सुरू आहे. त्यांच्या कार्याने मी प्रभावित झालो असून महिला सक्षमीकरणासाठी महाराजांचे मोठे योगदान आहे. अध्यात्मिक मार्गदर्शना बरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचे देखील कार्य ते करत आहेत, याचा मनस्वी आनंद व्यक्त करतांनाच छत्रपती घराण्यावर बाबाजींचा सदैव आशीर्वाद असावा असे विचार  छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार  छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.       निष्काम कर्मयोगी जागदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर समर्थ सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात दिनांक १९

खा. युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत, म्हाळसामाता पुण्यतिथी निमित्त जपानुष्ठाण व ध्वजारोहन सोहळा तसेच रक्षाबंधनानिमित्त महीलांना वस्रभेट कार्यक्रम ! ॐ जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रम ओझर (मिंग) येथे २२ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाला राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री ना. अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
म्हाळसामाता पुण्यतिथी व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन ! या कार्यक्रमाला महीलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन छावा क्रांतीवीर सेना नासिकच्या वतीने करण्यात आले आहे !            नासिक(२१)::-दि. २२ ऑगस्ट रोजी ॐ जगतगुरु जनार्दन स्वामी (मौनगिररीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी परमपूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व ओझर येथील पावन सानिध्यात, मातोश्री म्हाळसामाता पुण्यतिथी व रक्षाबंधना निमित्ताने महिलांना वस्रभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,  या कार्यक्रमसाठी खा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असून, दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री ना. अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली.         या प्रसंगी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना खा. स़भाजीराजे यांनी कठीण समयी मानसिक, सामाजिक व स्वता पूरस्थिती वर नजर ठेवून सर्वसमावेशक निर्णय घेतल्याचा व जनतेला धीर देण्याचे कार्य करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना मदत करण्य