राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचे मानधन व अतिथ्य भत्त्यात वाढ करण्यात आली असल्याबाबत काल शासन निर्णय निर्गमित करण्यात आला !! सविस्तर माहितीसाठी शासन निर्णय पहावा , बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व
औद्योगिक नागरी अधिनियम १९६५, कलम ६१(१) मधील तरतूदीनुसार शासन वेळोवेळी निर्धारीत करेल, इतके मानधन व अतिथ्य भत्ता देय आहे. संदर्भात शासन निर्णयान्वये राज्यातील
नगरपरिषदांमधील नगराध्यक्षांचे मानधन व अतिथ्य भत्ता निर्धारीत करण्यात आला होता. नगराध्यक्षांची
जबाबदारी, कायमस्वरूप विचारात घेऊन, सदर मर्यादा वाढविण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत
होती. नगराध्यक्षांना मानधन व अतिथ्य भत्त्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णयानुसार मानधन व आतिथ्य भत्ता देय राहील. दरमहा जास्तीत जास्त मानधन व दरवर्षी जास्तीत जास्त अतिथ्य भत्ता खालीलप्रमाणे देण्यात येणार.
(क्रमाने--नगरपरिषद/नगरपंचायत वर्ग, मानधन, आतिथ्य भत्ता )
अ वर्ग रू.25,000/.        रू 36,000/-
ब वर्ग   रू.20,000/-       रू.24,000/-
क वर्ग   रू.15,000/-.      रू.18,000/
याप्रमाणे मंजूरी देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !