पी.एम.एस प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश ! प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या लेखी सूचना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
नाशिक – नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सर्व बांधकाम विषयक विकास योजनांसाठी पी. एम. एस. प्रणालीच्या माध्यमातून कार्यवाही करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक केले आहे. सदर प्रणालीची अंमलबजावणी तसेच ई-निविदा विषयक तक्रारीचे निराकरण करणे सुलभ तसेच जलदगतीने व्हावे याकरिता सर्व नोंदणीकृत ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्था या प्रवर्गातील ठेकेदारांच्या साठी गुगल फॉर्मवर आधारित तक्रार प्रणाली सुरू करण्यात आली असून या प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी केले आहे. सदर तक्रार प्रणाली नोंदणीकृत ठेकेदारानं करिता असून सदर तक्रारीत कामाचे नाव ठेकेदाराचे नाव ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंदविणे तसेच पी. एम. एस. (प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम) अथवा ई-निविदा विषयक कामाच्या बाबतीत पीएमएस क्रमांक अथवा इ निविदा क्रमांक टेंडर आयडी नोंदविणे आवश्यक राहणार आहे. सदर तक्रार प्रणाली ऑनलाइन असल्याने ज्या विभागांशी संबंधित सदर तक्रार असेल त्यांनाही तक्रार ई-मेल द्वारे प्राप्त झाल्यानंतर सदर तक्रारीचे निवारण करून त्याबाबत केलेल्या