तीनशे स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदानातून राबविली स्वच्छता मोहीम ! मोहीमेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारींसह अनेकांचा सहभाग !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज  किल्ले रामशेज (ता. दिंडोरी)  येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या श्रमदानातुन रामशेज गावात तसेच किल्याच्या माथ्यावरील विविध प्रकारचे प्लास्टिक जमा करण्यात आले. या मोहिमेत तीनशेहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्राम दत्तक योजना राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये श्रमदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी  चंद्रकांत भावसार, सरपंच जिजाबाई कांजळे, उपसरपंच संजय बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभिनयाचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी किल्याच्या पायथ्यापर्यंत स्वतः श्रमदान करून प्लास्टिक संकलित केले. किल्यावरील मंदिर तसेच परिसराचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली. यावेळी बोलताना पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दत्तक ग्राम योजनेंतर्गत पाणी व स्वच्छता विभागामार्फत ग्रामपंचातींमध्ये लोकसहभागातून श्रमदान मोहीम राबविण्यात येत असून रामशेजपासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे सांगितले.तसेच आजच्या मोहिमेत गाव व किल्ल्यावरील विविध प्रकारचे 6 गोण्या इतके प्लास्टिक जमा करण्यात आल्याची माहिती दिली. या मोहिमेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशिल कोशिरे, ग्रामसेवक श्रावण वाघचौरे, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा व तालुका कक्षातील समन्वयक, विविध गावातील ग्रामसेवक, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला बचत गट आदी  मोठया संख्येने सहभागी झाले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

प्रशासन की ताकद !! बिगर मंत्री मंडल की सहायता के भी प्रदेश का शासन सफलतापूर्वक चलाया जा सकता है । प्रशासन को भी उन्होंने यह स्पष्ट संदेश दिया है कि मंत्रियों के बीच विभागों के बंटवारे के न हो पाने के बावजूद मुख्यमंत्री पूरे प्रदेश को ‘‘नौकरशाही‘‘ के माध्यम से आवश्यक कार्य निष्पादित (एग्जीक्यूट) कर संदेश देने में सक्षम हैं।