इंदोरस्थित सुर्योदय परीवाराकडून दत्तजयंती उत्सव साजरा ! राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांच्या अपूर्ण राहिलेल्या सामाजिक कार्य अखंडपणे सुरू राहणार- डॉ. आयुषी देशमुख. सामाजिक कार्यात अग्रेसर सुर्योदय परीवारावर टिका करणाऱ्यांना छावा शैलीत उत्तर दिले जाईल - करन गायकर. न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील यांच्या कार्याचा सुर्योदय परीवाराकडून यथोचित गौरव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इंदोर येथे दत्त जयंती उत्सव साजरा-  सूर्योदय परिवार.
श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर द्वारा आयोजित श्री दत्तजयंती महोत्सव २०१९ दि.११ डिसेंबर २०१९ रोजी ,सद्गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या अशिर्वादाने, प्रेरणेने ,वास्तव्याने पुनीत झालेल्या सूर्योदय आश्रम ,भारत माता मंदिर ,बापट चौराहा, सुखलिया इंदोर येथे मोठ्या उत्साहात डॉ.आयुषी उदयसिंह देशमुख (धर्मपत्नी परमपूज्य श्री भय्यूजी महाराज) यांच्या मार्गदर्शन व समर्थ नेतृत्वाखाली संपन्न....
          
        इंदोर (११)::-दत्त जयंतीला दत्त तत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. यामुळे परम पूज्य भय्यूजी महाराज यांच्या नंतर देखील सूर्योदय परिवाराच्यावतीने अविरतपणे सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील वारसा जपण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवण्यात आलेले आहे. दत्तजयंती उत्सवानिमित्त
५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ सकाळी ९ ते १२
श्री गुरुचरित्र पारायण संपन्न झाले व सांगतादिनी ११ डिसें. रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा सुरूवात पहाटे ०६ .३० झाली,  पाद्यपूजन महाआरती , गुरुचरित्र पारायण समारोप, श्री दत्तयाग ध्यान साधना भजन, पालखी यात्रा, दुपारी सामाजिक कार्यक्रमांतर्गत
आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर, ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.
हिवाळा ऋतू अभियानांतर्गत गरीब महिलांना वस्त्रदान,  ब्लँकेट वाटप . पारधी समाजाच्या मुलांना मोबाईल टॅबलेटचे वितरण. २०२० च्या दिनदर्शिकेचे अनावरण, व सतत तीन वर्षे स्वच्छ इंदोर शहर पुरस्कार ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान व गुणगौरव करण्यात आला, सायंकाळी भव्य कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन व महाप्रसाद, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी परमपूज्य आदरणीय भय्यूजी महाराज यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला, अनेक मान्यवरांचे मनोगत याठिकाणी संपन्न झाले यात प्रामुख्याने डॉक्टर आयुषी उदयसिंह देशमुख यांनी भय्यूजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या योजनांमधील अपूर्ण राहिलेले अखंड भारतातील उपक्रम व कार्य यापुढे सूर्योदय परिवाराच्या वतीने अविरतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी व कर्तव्य प्रामाणिकपणे सुरू ठेवण्यासाठी सर्व गुरुबंधू भय्यूजी महाराज यांच्या सोबत काम केलेल्या सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना सोबत घेऊन सुरू ठेवण्याचा मानस तथा ध्यास व्यक्त केला.
            छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी त्यांच्या मनोगतात महाराजांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला त्यांच्या राहिलेल्या अपूर्ण कार्यासाठी मी व माझी सर्व संघटना सोबत असून सेवा सुरू ठेवण्याचा शब्द या वेळेस उपस्थितांच्या समोर दिला. तसेच महाराजांच्या कृपाशीर्वादाने मोठे झालेले सर्व गुरुबंधू परंतु महाराजांच्या अकाली जाण्याने काहीसे  सूर्योदय परिवारापासून दूर राहू लागलेले होते त्यांनी देखील आपली मरगळ दूर करून, नैराश्य झटकून पुन्हा एकदा जोमाने सूर्योदय परिवाराचे काम अखंड हिंदुस्थानामध्ये सुरू ठेवण्याची तयारी दर्शवावी असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी सूर्योदय परिवारावर व डॉ.आयुषी भाभी यांच्यावर टीका केली त्यांचा देखील आपल्या खास "छावा शैलीत" खरपूस समाचार घेतला.
            यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. विनायक मेटे  (छत्रपती शिवरायांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष मुंबई ), संभाजीनगरचे आ. अंबादास दानवे,
करण गायकर, अजमेर शरीफ गादी मशीद चे डॉ. सय्यद इरफान महम्मद उमानी, काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शोभा ओझा , मध्यप्रदेश विरोधी पक्ष नेत्या फौजिया शेख , आचार्य रामचंद्र शर्मा वैदिक, मध्यप्रदेशचे मा. राज्यमंत्री योगेंद्र महंत, न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, प्रा.उमेश शिंदे, शिवाजी राजे मोरे, पंकज जऱ्हाड पाटील, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, नितीन पाटील , सागर शेजवळ  ,सतीश नवले, गणेश दळवी, करण शिंदे, विकास काळे, रोहन सपकाळ, मंगेश कदम, आदित्य पाटील, सचिन जाधव, रवि भांभिरगे आदी महाराष्ट्र व नाशिक मधून अनेक गुरुबंधू व छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!