होळी- होलूबायला सिनगार केला कयाचा गं....... अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801 *********************************** अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती ! आदिवासी वारली जमात निसर्गस्नेही आणि पर्यावरणरक्षक आहे. परंपराप्रिय वारली स्त्रीपुरुष सण - उत्सवात मनापासून रमतात. त्यांच्यासाठी होळीचा सण दिवाळीपेक्षाही मोठा आहे. माघ पौर्णिमेपासून त्यांच्या होलिकोत्सवाला प्रारंभ होतो. फाल्गुन पौर्णिमेला संपूर्ण पाड्याची एक सामूहिक होळी साजरी केली जाते. पंचमीपर्यन्त चालणाऱ्या या शिमग्यात धुळवडही उत्साहात होते. यावेळी एकमेकांना नैसर्गिक रंगानी रंगवतात. चेष्टामस्करीसाठी अगदी स्त्रीवेषापासून ते पोलिसापर्यंत विविध सोंगे वठवली जातात. याच अग्निपूजन परंपरेच्या अभिव्यक्तीचे सुंदर चित्रण वारली कलेतही दिसते. वारली पाड्यांवर माघ पौर्णिमेला होलिकोत्सव सुरु होतो. महिनाभर दररोज संध्याकाळी लहानशी होळी पेटवतात. यावेळी हवेत गारवाही असतो. फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी सार्वत्रिक मोठी होळी पेटवली जाते. दुपारीच जंगलातून चिंबी म्हणजे हिरवा बांबू आणून पाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जमिनीत रोवतात. काही भागात शिरीष वृक्षाचा सोटा वापरण्याची प्रथा आहे. होळीच