आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सामाजिक सभागृह कामाचे भूमिपूजन ! विनामोबदला जागा उपलब्ध करून देणाऱ्याचा आमदारांनी केला सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!



पिंपळनेर (साक्री)::- ग्रामपंचायत मळगाव (प्र ) वार्सा अंतर्गत डोंगरपाडा येथे आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत, सामाजिक सभागृह कामाचे भूमिपूजन साक्री तालुक्याच्या आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांच्या हस्ते पार पडले.
     सदर कार्यक्रमाला प. स.सदस्य. शांताराम दादा कुवर, सागर गावित, सरपंच किरण बागुल,  उपसरपंच रमेश साबळे, दरेगाव ग्रामपंचायतीचे गटनेते विक्रम भोये, ग्रामसेवक रतिलाल पवार, ग्रामपंचायत सदस्य देवजी मावची, पोलीस पाटील विलास गांगुर्डे, माजी सरपंच वसंत कुवर, छोटुदादा कुवर, पांडू राऊत तसेच  पंचक्रोशीतील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
      सदर कार्यक्रमात सामाजिक सभागृहासाठी सामाजिक बांधिलकी जपून, विनामोबदला  जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल डोंगर पाडा येथील ज्येष्ठ नागरिक सापट दादा गांगुर्डे  यांचा सत्कार आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !