यशवंत पंचायत राज अभियान : जिल्ह्यातील पंचायत समित्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!न्यूज
मसाला सर्विसेस, ७३८७३३३८०१
*********************************

यशवंत पंचायत राज अभियान :
जिल्ह्यातील नाशिक व कळवण पंचायत समित्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागात द्वितीय व तृतीय पुरस्कार

         नाशिक : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांची घोषणा केली. याअंतर्गत नाशिक विभागात नाशिक पंचायत समितीने विभागात द्वितीय (जि. नाशिक) तर कळवण पंचायत समितीने अनुक्रमे तृतीय (जि. नाशिक) क्रमांकाचे पुरस्कार पटकावले, कळवण पंचायत समितीने सलग तिस-यांदा पुरस्कार मिळवला आहे, केंद्र व राज्य शासनाकडुन गट स्तरावर राबविल्या जाणा-या योजना त्याच बरोबर उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज याचे मुल्यमापन विभागस्तरावर करण्यात येऊन अखेर ३ पंचायत समित्यांची निवड ही विभाग निहाय करण्यात येते. नाशिक व कळवण या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये सोलर पॅनलिंगचा वापर करुन उर्जेची बचत, स्वच्छ भारत मिशनची अमलबजावणी, वृक्षलागवडीची १०० टक्के उद्दीष्टपूर्ती, संपुर्ण लसीकरणाची उद्दीष्टपूर्ती यासह इतर सर्व योजना व कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणत हा पुरस्कार पटकावला आहे, या पंचायत समित्यांना प्रत्येकी (द्वितीय क्रमांक) ८ लाख रुपये आणि (तृतीय क्रमांक) ६ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरुपाचा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे, या विशेष कामगीरीबद्दल दोन्ही पंचायत समित्यांच्या सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना.बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!