पोस्ट्स

ग्रेस आणि भातुकली ! " चंद्रमाधवीचे प्रदेश " या काव्यसंग्रहातील " भातुकली " ही कविता लेखिका वर्षा थोटे यांनी केलेलं विश्लेषण !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ग्रेस आणि भातुकली ================ " चंद्रमाधवीचे प्रदेश " या काव्यसंग्रहातील " भातुकली " ही कविता . तसं तर भातुकलीचा प्रत्यक्ष उल्लेख नाही अशाही कविता आहेत. भातुकलीच्या खेळात रममाण होणा-या मुलीला जशी खेळभांडी खरी वाटावीत आणि त्याच विश्वात मश्गूल होऊन खेळतांना बाहेरच्या जगाचा पूर्णपणे विसर पडावे तसे काहीसे ही कविता वाचतांना होते. " अर्धा माझा भास अर्धसत्य तुझे त्याच्यासाठी ओझे आभाळाचे"           माझ्या मी पणात मी तरी कुठे पूर्णपणे अस्तित्व राखून आहे. अगदी त्या अर्धनारीनटेश्वरासारखं तुझं माझ्या श्वासात , ह्रद्यात , मनात अगदी नजरेतही अस्तित्व जाणवतं. माझा मी पूर्णपणे सावलीलाही ओळखू येत नाही. तू आणि मी जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत की काय असाच तो भास !! . तू आणि मी वेगळे का  आहोत बरं !! " माझ्या तंद्रीविण    तुला दुःख नाही      तसू तसू नाही          जडपण "              माझी ध्यानवस्था तुझ्या स्मरणात लागली की आपसूकच तुला माझी आठवण छळत असावी. मग तुला अगदी गवताच्या पातीवर मावेल एवढंही दुःख जाणवत नसेल. त्या दुःखातून आलेल जडपण तर तू दुर कु

जीवननिष्ठा आणि निसर्गावरील श्रद्धा हीच वारली कलेची प्रेरणा आहे ! आदिवासी कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावे ! जिवा भावाचे मनोगताचा उत्तरार्ध वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
चैतन्यशील वारली चित्रशैली...                                                       दहाव्या शतकापासून अस्तित्वात असणारी आदिवासी वारली चित्रशैली आता सर्वत्र लोकप्रिय ठरली आहे. जगाच्या कॅनव्हासवर सन्मानाने विराजमान झाली आहे. अर्थातच याचे श्रेय पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनाच जाते. मुळात वारली चित्रे स्त्रियाच चितारीत. जिव्या यांनी या कलेत प्रावीण्य मिळवून आपला ठसा उमटवला. पुरुष कलाकारांसाठी वाट मोकळी करून देऊन एक प्रकारची क्रांती केली. हल्ली वारली महिलांपेक्षा पुरुषच मोठ्या प्रमाणावर चित्रे रंगविताना दिसतात. मशे यांनी मागील आठवड्यात 'जिवा' भावाचे मनोगत व्यक्त केले होते, त्याचा हा उत्तरार्ध.     माझा उल्लेख अनेकजण 'वारली चित्रकलेचा जनक' असा करतात, मात्र मी असे श्रेय घेणे अयोग्य आहे.तब्बल ११ शतके ही कला असंख्य अज्ञात महिलांनी,कलाकारांनी ही जिवंत ठेवली. त्या समृद्ध परंपरेचा मी एक प्रतिनिधी आहे, असे म्हणणे या संदर्भात उचित ठरेल; त्याचा मला सार्थ अभिमानही आहे. 'वारली' असे जरी या कलेला आमच्या आदिवासी जमातीचे  समूहवाचक नाव असले तरी ती मनुष्य देहासारखी नश्वर नाही; याचे क

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका सेवेत दाखल ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका सेवेत दाखल !         नाशिक ::- जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या व रुग्ण वाहिका नसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पुरविण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य लहवित, सय्यदपिंप्री, अंजनेरी, पळसन, करंजाळी, चिंचओहळ, दळवट व उंबरगव्हाण या आरोग्य संस्थांना १०२ क्रमांकाच्या फोर्स कंपनीच्या बी टाइप रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेसाठी प्राप्त रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा कोरोना नियम पाळून प्रातिनिधिक स्वरूपात नाशिक जिल्हा परिषद आवारात नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर  व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे शुभहस्ते वाहन चालकांचे हाती रुग्णवाहिकांच्या चाव्या व रुग्णवाहिकेचे नोंदणी प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, माजी बांधकाम सभापती विलास बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक

Xxxxxx locked his profile ! स्वत:चे ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचे पहायचे वाकून !! सुप्रसिद्ध लेखक नागेश शेवाळकर यांनी थोडक्यात घेतलेला समाचार वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कुलूप बंद परिचय!         सकाळी सकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी फेसबुक सुरु केले. पाहतो तर काय तब्बल एकवीस मैत्रीच्या विनंत्या येऊन पडल्या होत्या. मनोमन खूप खुश झालो कारण कुणीतरी आपणहून माझ्याशी मैत्री करु पाहत आहे ही अभिमानाची गोष्ट होती. आपण आता विख्यात, प्रसिद्ध असे काही तरी मोठे झालो आहोत या समाधानात मी एका- एका विनंतीदाराचे खाते उघडत गेलो. तसतसा माझा चेहरा पडत गेल्याचे मलाच जाणवले..  कारण एकवीस पैकी वीस जणांनी आपला परिचय कुलूपबंद केला होता. एकविसावी व्यक्ती  अनोळखी महिला होती. तिचा परिचय होता परंतु एका अनोळखी महिला आपल्या पतीची मैत्रीण आहे हे समजताच कुटुंबात संशयकल्लोळ व्हायला नको म्हणून मी ती मैत्री स्वीकारली नाही...        आजकाल फेसबुकवर एक नवीन कृती दिसून येत आहे...      अनेक वर्षांनंतर शालेय जीवनातील एखाद्या मित्राची फेसबुकवर 'मैत्रीची विनंती' येते. आपण मोठ्या उत्साहाने ती मैत्री स्वीकारण्यापूर्वी हा आपला मित्र काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे फेसबुक खाते उघडतो किंवा 'मित्राचा मित्र तो आपला मित्र' अशा धाग्यातून एखाद्या मित्राच्या मित्राची मैत्रीची विनंत

मानसिक स्वास्थ्य व समुपदेशन : कोरोना आणि त्यानंतर ची परिस्थिती या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय आॅनलाईन वेबिनार संपन्न ! कोरोना आपत्ती काळाला संपत्ती समजून सामोरे जाणाराच खरा युवा असतो- डॉ. वासुदेव पाटील

इमेज
विजय सुर्यवंशी, जामनेर यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801 दोनदिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनार उत्साहात     जामनेर::-२०मे २०२१ रोजी नेहरू युवा केंद्र जळगांव आणि अ. र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने "मानसिक स्वास्थ्य व समुपदेशन : कोरोना आणि त्यानंतर ची परिस्थिती " या महत्वाच्या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. वेबिनारमध्ये देशभरातील शिक्षक, जेष्ठश्रेष्ठ मान्यवर, तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला. वेबिनारची प्रस्तावना नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर करताना वेबिनारच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली. वेबिनारचे प्रमुख उदघाटक संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद यांनी मनोगतात आजकाल कोरोना काळात मानसिक समुपदेशनाची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. तसेच अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे असे मत मांडले. वेबिनरच्या या प्रथम सत्राचे अध्यक्ष कबचौ, उमवि जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे हे होते.        बुधवारी या वेबिनारमध्

जिवा भावाचे मनोगत ! सालगडी ते पद्मश्री पुरस्कार !! न्यूज मसाला सर्विसेस नासिक, 7387333801,. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
  न्यूज मसाला सर्विसेस नासिक, 7387333801 *********************************** 'जिवा' भावाचे मनोगत !     दि.१५ मे हा वारली चित्रशैलीचे उद्गाते, पितामह, पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचा स्मृतिदिन. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांमधून त्यांनी कायमच रसिकांशी संवाद साधला. एका ८ फूट उंच व ५ फूट रुंद चित्रात त्यांनी आपले आत्मचरित्रच रंगवले आहे. तृतीय स्मृतिदिनाच्या औचित्याने हा प्रथमच थेट सुसंवाद ! त्यांच्या मी घेतलेल्या मुलाखती, वेळोवेळी त्यांनी मांडलेले विचार यांच्या आधारे हे 'जिवा' भावाचे मनोगत व्यक्त करतो आहे...    १९७० च्या दशकात भास्कर कुलकर्णी हा अवलिया कलाकार माझ्या कलमीपाड्यावर आला. पुपुल जयकर यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या अलौकिक क्षणाने वारल्यांचे जीवन उजळून गेले. १९७२- ७३ च्या सुमारास ही कलाप्रेमी मंडळी जर संपर्कात आली नसती, तर चार भिंतीत लपलेली आमची पारंपरिक आदिवासी वारली चित्रशैली प्रकाशात आलीच नसती. भास्करने भिंतीवरील चित्रे आमच्याकडून कागदांवर रंगवून घेतली. तो मला व चार वारली महिला कलाकारांना दिल्लीला घेऊन गेला. तेथील कलामेळ्यात आमची कला प्रथमच लोकांसमो

१७ मे पासून अंगत पंगत ! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, ७३८७३३३८०१. अंगत पंगत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
        न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, ७३८७३३३८०१ *********************************    १७ मे पासून अंगत पंगत !                    'फक्त मराठी वाहिनी'ने एकापेक्षा एक चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी 'साईबाबा श्रद्धा आणि सबुरी', 'सप्तपदी' या नव्या मालिकांच्या यशस्वी आगमनानंतर आणखी एका शोची तयारी सुरु झाली, काही भाग चित्रीतही झाले, परंतु याच काळात मुंबईसह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाले. वाहिनीने आपल्या कलावंत तंत्रज्ञांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ सर्व मालिकांचे चित्रीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येऊ घातलेल्या  'अंगत पंगत'  या खाद्य परंपरेवर आधारित आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे प्रसारण लांबणीवर गेले. आता हा शो येत्या १७ मे पासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर सोमवार ते शुक्रवार दुपारी २:०० वाजता, प्रसारित प्रसारित होणार आहे.              'अंगत पंगत'  या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कुटुंबाला एकत्रित, गप्पा मारत हा शो पहाता येईल. आपल्या आवडीच्या खाद्य पदार्थांची