जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका सेवेत दाखल ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!



जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका सेवेत दाखल !

        नाशिक::- जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या व रुग्ण वाहिका नसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पुरविण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य लहवित, सय्यदपिंप्री, अंजनेरी, पळसन, करंजाळी, चिंचओहळ, दळवट व उंबरगव्हाण या आरोग्य संस्थांना १०२ क्रमांकाच्या फोर्स कंपनीच्या बी टाइप रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेसाठी प्राप्त रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा कोरोना नियम पाळून प्रातिनिधिक स्वरूपात नाशिक जिल्हा परिषद आवारात नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर  व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे शुभहस्ते वाहन चालकांचे हाती रुग्णवाहिकांच्या चाव्या व रुग्णवाहिकेचे नोंदणी प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, माजी बांधकाम सभापती विलास बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे व आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे उपस्थित होते.

_ग्रामीण भागातील गोर गरीब रुग्णांना प्राप्त रुग्ण वाहिकांद्वारे चांगली आरोग्य सेवा मिळेल व रुग्णांना जीवदान देणारी आपली सेवा राहील अशी अपेक्षा  नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी उपस्थित वाहन चालकांकडून अपेक्षा व्यक्त केली._

नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिका मिळणेबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून पाठपुरावा जिल्हा परिषदेने केला होता. सध्याच्या कोरोना साथरोग काळात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर करून दिल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ, कृषिमंत्री नामदार दादा भुसे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !