१७ मे पासून अंगत पंगत ! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, ७३८७३३३८०१. अंगत पंगत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!



       
न्यूज मसाला सर्विसेस,
नासिक, ७३८७३३३८०१
*********************************

   १७ मे पासून अंगत पंगत !
   
               'फक्त मराठी वाहिनी'ने एकापेक्षा एक चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी 'साईबाबा श्रद्धा आणि सबुरी', 'सप्तपदी' या नव्या मालिकांच्या यशस्वी आगमनानंतर आणखी एका शोची तयारी सुरु झाली, काही भाग चित्रीतही झाले, परंतु याच काळात मुंबईसह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाले. वाहिनीने आपल्या कलावंत तंत्रज्ञांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ सर्व मालिकांचे चित्रीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येऊ घातलेल्या 'अंगत पंगत' या खाद्य परंपरेवर आधारित आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे प्रसारण लांबणीवर गेले. आता हा शो येत्या १७ मे पासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर सोमवार ते शुक्रवार दुपारी २:०० वाजता, प्रसारित प्रसारित होणार आहे.
             'अंगत पंगत' या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कुटुंबाला एकत्रित, गप्पा मारत हा शो पहाता येईल. आपल्या आवडीच्या खाद्य पदार्थांची रेसिपी, त्यांचा इतिहास, तसेच एकाच घटक पदार्थापासून महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी व विदेशात कसा व कोणता पदार्थ तयार केला जातो याची रंजक माहिती घेता येईल. स्वादिष्ठ आणि तृप्त करणाऱ्या खमंग पाककलांची बहारदार रेसिपी 'अंगत पंगत' या शोमध्ये पाहता येईल. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज असतील. या तिन्ही रेसिपी एकाच घटक पदार्थापासून तयार केल्या जाणार आहेत. यात पहिला विभाग - वदनी कवळ, अर्थात देशी, आपल्या मातीतले पदार्थ असतील. दुसरा विभाग - मिक्स मेजवानी, अर्थात फ्यूजन रेसिपीचा आणि तिसरा विभाग - सातासमुद्रापार यात साता - समुद्राबाहेरील पदार्थांची ओळख होणार आहे.
          आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक्सिक्युटीव्ह शेफ शंतनू गुप्ते 'अंगत पंगत'मध्ये भारतीय पदार्त्यांसोबतच मॉडर्न युरोपियन रेसिपी प्रेक्षकांना तयार करून दाखविणार आहेत. त्यांनी युरोपमधील 'नॉर्थ नॉर्वे' विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेत्री सायली देवधर करीत आहे. तिचे खुमासदार सूत्रसंचालन 'अंगत पंगत' अधिकच रुचकर करणार आहे. या शो मध्ये दर शुक्रवारी आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या आवडीचे पदार्थ ते स्वतः करून दाखविणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, संदीप पाठक, रुपाली भोसले, स्नेहा रायकर, दीप्ती भागवत, ‘सप्तपदी’ मालिकेची नायिका तृप्ती देवरे असे अनेक लोकप्रिय कलाकार आपले आवडते पदार्थ बनवताना दिसतील आणि त्यासोबत मनमोकळ्या गप्पांतून सवांद साधतील.
          'अंगत पंगत' या शोची निर्मिती निखिल रायबोले, भुपेंद्रकुमार नंदन यांच्या 'कॅफे मराठी' या संस्थेची असून दिग्दर्शन हेमंत तांबे यांचे आहे. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी या 'अंगत पंगत'चे शीर्षक गीत लिहिले असून संगीतकार रोहित नागभिडे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. 'अंगत पंगत'चं लेखन अभिजित पेंढारकर यांचं असून छायांकन - नरेश राम शिवगन यांनी केले आहे. या शोची आकर्षक सजावट कलादिग्दर्शिका तृप्ती ताम्हाणे यांनी केले असून संकलन मनीष शिर्के, सिद्धेश हडकर यांचे आहे. या शो साठी 'फक्त मराठी वाहिनी'चे वरिष्ठ कार्यकारी निर्माता संकेत पावसे तर बिझनेस हेड शाम मळेकर आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!