सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतील ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त मार्गदर्शक सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त मार्गदर्शक नाशिक । प्रतिनिधी आज ३० ते ५० उमेदीच्या वयोगटातील युवापिढी हृदयरोगाचा विळखा पडत आहे. या आजाराची भीषणता लक्षात घेता हृदयरोगासबंधी प्रबोधन व्हावे, याची लक्षणे, कारणे समजावित आणि तो होऊ नये याकरिता आहार, व्यायाम, जीवनशैली यासह याविषयीचे गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक लिहले आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. अतुल पाटील यांनी बंंगळुरू येथून कार्डिऑलॉजीचे शिक्षण घेतले आहे. नाशिकमध्ये ते सध्या आशा हार्ट केअर क्लिनिकच्या माध्यमातून रूग्णसेवा देत आहेत. या दरम्यान त्यांनी अनुभवले की कमी वयात कारकीर्द घडवण्याच्या काळात यूवापिढी हृदयरोगाने ग्रासते आहे, हे वास्तव त्यांना अस्वस्थ करत होते आणि हे कुठेतरी थांबायला हवे या उद्देशाने ‘नो हायपर टेन्शन पुस्तक लिहण्याचे त्यांनी ठरवले. उच्च रक्तदाब असणार्या रुग्णांचे प्रमाण देशात २५ ते ३० टक्के आहे अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्यां लॅनसेट या वैद्यकीय पत्रिकेत प्रसिद्ध