पोस्ट्स

भारतीय संख्याशास्त्रज्ञ : डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई !

इमेज
डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई हे अमेरिकेत कार्य करणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते.  संख्याशास्त्रामधील  बहुचलीय विश्लेषण (मल्टीव्हेरियेंट अनालिसिस ) आणि संभाव्यता वितरणे  (प्रोबाबिलीटी  डिस्ट्रीब्युशनस)  या क्षेत्रातील त्यांचे संशोधन सुप्रसिद्ध आहे. ५ जून हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तने त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय ! भारतीय संख्याशास्त्रज्ञ : डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई  !              अमेरिकेत संख्याशास्त्राचे अध्यापन तसेच संशोधन कार्य करणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई यांचा जन्म २४  फेब्रुवारी १९२०  रोजी केरळमध्ये झाला. त्यांनी बहुचलीय संख्याशास्त्रीय विश्लेषण (मल्टीव्हेरियेट स्टॅटिस्टिकल अनालिसिस) यावर विशेष संशोधन, १९४५ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली.  त्यानंतर  त्यांची केरळ विद्यापीठात व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि तेथे ते  १९५१ पर्यंत  अमेरिकेला जाईपर्यंत सहा वर्षे अध्यापन कार्य करत राहिले. १९५१ साली ते प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन अभ्यासासाठी गेले. तेथे एक वर्ष अभ्यास केल्यानंतर ते नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठात गेले आणि  तेथे त्यांनी संख्याशास्त

काॅंग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष यांनी दिला एका पदाचा राजीनामा !

इमेज
        शिर्डी::- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली उदयपूर येथील शिबिरातील आवाहनानुसार "एक व्यक्ती एक पद" या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद आहेर यांनी आपल्या शहर अध्यक्ष या पदाचा शिर्डी येथील दोन दिवसीय नव-संकल्प शिबिरात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे नाशिक शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

प्रेम उठाव संमेलन ! दुःखाचा समुद्र, डोळ्यात दाटल्यावर, टपटपतात, टपोरे थेंब, कविता होऊन, कागदावर,,,,,,,,, - नवनाथ रणखांबे

इमेज
दुःखाचा समुद्र, डोळ्यात दाटल्यावर,  टपटपतात, टपोरे थेंब, कविता होऊन, कागदावर,,,,,,,,-  नवनाथ रणखांबे          कल्याण (प्रतिनिधी)::-दुःख पाहून.  दुःख सोसून  कलावंत अस्वस्थ होत असतो. कलावंत हा दुःखाच्या वेदना सोसून निर्माण होतो. वेदनेच्या कळा सहन करून कलावंत आपली कला  -  साहित्य निर्माण करतो.  दुःखाचा समुद्र डोळ्यात दाटल्यावर  टपटपतात टपोरे थेंब कविता होऊन कागदावर ! कविता अशी निर्माण होते.   प्रेम उठाव   कविसंमेलनाचा विषय  प्रेमावरील कविता हाच आहे. मुळात प्रेम म्हणजे  तिच्या आणि त्याच्या प्रेमाच्या  कविता नसून प्रेमाचे विविध पदर आहेत.  त्यात दुःख , अबोला ,विरह मिलन इ. येते.  त्यात तो आणि ती यांचे प्रेम  , कौटुंबिक  प्रेम, समाजाप्रती प्रेम, देशाप्रती प्रेम,  महामानवा विषयी प्रेम असे प्रेम विविध प्रकारचे आहे. त्याला विविध पदर आहेत. हृदय आणि जग प्रेमानेच जिंकता येते. त्यामुळे प्रेम उठाव हे कवी संमेलन एक अनोखे असे वेगळे कवी संमेलन म्हणून यादगारच राहणार आहे.  या कविसंमेलनात  सर्व कवींनी  प्रेमा वरील कवितेच्या सादरीकरणाने प्रेमाचा पाऊस पाडला आहे.    असे प्रतिपादन साहित्यिक नवनाथ रणखांबे लिखित

काॅग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली !

इमेज
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या अंतर्गत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकी बाबत चर्चा व सविस्तर माहिती देऊन मतदार याद्याचं सादरीकरण करून ब्लॉक अध्यक्षांकडे देण्यात आल्या. त्यावेळी शरद आहेर यांनी निवडणूक कशा प्रकारे होणार याबाबत सविस्तर विवेचन केले, निवडणुकीत उभं राहण्यासाठी सभासद हा सक्रिय सभासद असला पाहिजे असे सांगितले.  शिर्डी येथे १ व २ जून ला शिबीर संपन्न होणार आहे त्यात निवडक पदाधिकारी जाणार आहेत,  तसेच ११ जून ते १४ जून या कालावधीत शहर स्तरावरील एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.                       याप्रसंगी माजीमंत्री डॉ.शोभाताई बच्छाव , गटनेते शाहू खैरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल,  केशव अण्णा पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय राऊत, अनुजाती विभागाचे प्रदेश सचिव सुरेश मारू, अल्पसं

विशेष लेख शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप !

इमेज
विशेष लेख शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप ! जुन्या आठवणींना उजाळा देत एक पाऊल सेवानिवृत्तीच्या दिशेने...      नाशिक : नेहमी सर्वांशी मनमिळावू, जीवाभावाचे नाते जोडणारे सर्व पत्रकारांचे परिचित व्यक्तीमत्व म्हणजे श्री.साहेबराव जगताप. आज त्यांच्याविषयी विशेष लिखाण करण्याचे कारण म्हणजे आज दिनांक ३१ मे २०२२ रोजी जगताप २७ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिृत्त होत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचानलाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय धुळे यांच्या अधिनस्त प्रकर्षित प्रसिद्धी पथक कार्यालय, नवापूर, जि.धुळे येथून शासकीय सेवेची सुरुवात करत आज त्यांचा अतिशय गोड पद्धतीने नाशिकच्या जिल्हा माहिती कार्यालय, येथून सिनेयंत्रचालक पदावरुन सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. साहेबरांवाच्या बाबत थोडक्यात सांगायचे तर, एवढंच आहे की एका छोट्याशा दुर्गम आदिवासी भागातून कळवण तालुक्यातील पाटविहीर या गावात त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थितीत जरी नाजूक असली तरी ईश्वरीय कृपने लहानपण खेळीमेळीने व आनंदात गेले. शिक्षण बी.ए (बी.जे ) पुर्ण केल्यानं

भावाच्या अपघाती निधनाची घटना 'काळजावर दगड ठेवत' पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !

इमेज
भावाच्या अपघाती निधनाची घटना काळजावर दगड ठेवत पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !          नाशिक, ता. २८ : चित्रपट कलाकार व 'लागिर झालं जी' या गाजलेल्या मालिकेचा नायक नितेश चव्हाण यांच्या मावस भावाचे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी समजल्यानंतर त्यांनी व त्यांच्या चमूने नियोजित चित्रपट प्रमोशनचा कार्यक्रम 'काळजावर दगड ठेवून' शनिवारी नाशिक शहरात पार पाडला व सायंकाळी चव्हाण अंत्यसंस्कारासाठी घटनास्थळी रवाना झाले. 'मजनू' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते नासिकला आले होते. ______________,         "धुमस" या चित्रपटाच्या यशानंतर शिवाजी दोलताडे "मजनू" हा चित्रपट घेवून येत आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून प्रमोशनावेळी ते म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला 'मजनू' समजतो, जे लोक हा चित्रपट पाहतील त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेवून चित्रित झालेला हा चित्रपट आहे. "मजनू" चित्रपटात रसिकांना फाई

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकरांकडून मुलगा सोहमला वाढदिवसाच्या पोस्टर शुभेच्छा !! "तू आणि मी, मी आणि तू "

इमेज
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकरांकडून मुलगा सोहमला वाढदिवसाच्या पोस्टर शुभेच्छा !!  "तू आणि मी, मी आणि तू " अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांची फ्रेश जोडी झळकणार 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटात ! अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र ! 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटाच्या पोस्टरचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न !                बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे हे सोप्प वाटणार प्रेम अजिबात नाही त्यात येणारी वादळे कधी दिशा भरकटवतील हे सांगणाऱ्या 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' या मराठी चित्रपटाचे पोस्टर

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

इमेज
राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने ! राज्य सरकारी, जिल्हा परीषद कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने...     नासिक::- जुनी पेन्शन लागू करा, रिक्त पदे त्वरीत भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, आदि मागण्यांकरिता आज दि २७ मे रोजी दुपारचे सत्रात कर्मचाऱ्यांचा अखिल भारतीय मागणी दिनाचे आजोजन निदर्शनाव्दारे करण्यात आले.               अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच बेगूसराय, बिहार येथे पार पडले. यात २७ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेवुन, केंद्र व राज्य सरकारचे कामगार कर्मचारी विरोधी धोरणा बाबत तिव्र आक्रोश व्यक्त केला आहे.         केंद्र सरकारची कार्पोरेट धार्जिणी अर्थनीती, कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांना बाधा आणून धनदांडग्यांना लाभ होईल अशा  सुधारणा कामगार कायद्यात करणे, महागाईने भरमसाठ उच्चांक गाठवुन त्यात गरीब जनता होरपळून जात आहे., अव्यवहार्य अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या माथी मारणे, सरकारी क्षेत्रातील कार्यालयात लाखो पदे रिक्त ठेवुन  बेरोजगारांचा भ्रमनिरास करणे, खाजगीकरणाचा अतिरेकी वापर करून सरकारी

जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र १० जूनला ! "फनरल"

इमेज
जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’ १० जूनला चित्रपटगृहात    नाशिक ( प्रतिनिधी ) -असं म्हणतात... आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस ! जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वाटूनही घेतला पाहिजे. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमधे, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो. 'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत 'फनरल' हा मराठी सिनेमा १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे.पत्रकार परिषदेत अभिनेता आरोह वेलणकर यांनी माहिती दिली.       या चित्रपटाने पीफ, इफ्फी, राजस्थान,कोकण यांसारख्या देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपट रू

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

इमेज
नाशिक : नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक, लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष भास्कर कृष्णा कोठावदे (वय ७४) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. कोठवदे यांनी नाशिकच्या सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे  भरून न निघणारे नुकसान झाले असून लाडशाखीय वाणी समाजाचे एक जेष्ठ छत्र हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.         नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा सुवर्णा नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. मंगळवारी (दि.२४ मे) रात्री १० वाजता अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **********************     नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व संस्थेच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक