भावाच्या अपघाती निधनाची घटना 'काळजावर दगड ठेवत' पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !

भावाच्या अपघाती निधनाची घटना काळजावर दगड ठेवत पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !

         नाशिक, ता. २८ : चित्रपट कलाकार व 'लागिर झालं जी' या गाजलेल्या मालिकेचा नायक नितेश चव्हाण यांच्या मावस भावाचे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी समजल्यानंतर त्यांनी व त्यांच्या चमूने नियोजित चित्रपट प्रमोशनचा कार्यक्रम 'काळजावर दगड ठेवून' शनिवारी नाशिक शहरात पार पाडला व सायंकाळी चव्हाण अंत्यसंस्कारासाठी घटनास्थळी रवाना झाले. 'मजनू' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते नासिकला आले होते.
______________,

        "धुमस" या चित्रपटाच्या यशानंतर शिवाजी दोलताडे "मजनू" हा चित्रपट घेवून येत आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून प्रमोशनावेळी ते म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला 'मजनू' समजतो, जे लोक हा चित्रपट पाहतील त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेवून चित्रित झालेला हा चित्रपट आहे. "मजनू" चित्रपटात रसिकांना फाईट, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत.
         'मजनू' चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे असून संगीतकार पी शंकरम्, सचिन अवघडे, साजन - विशाल, पार्श्वसंगीत पी. शंकरम्, विनीत देशपांडे यांचे आहे.  गीतकार दीपक गायकवाड, गोवर्धन दोलताडे, साजन बेंद्रे, गायक सलमान अली, आदर्श शिंदे, आनंदी जोशी, बेला शेंडे, संदीप उबाळे, विशाल चव्हाण हे आहेत.


       या चित्रपटात कलाकार  रोहन पाटील, नितेश चव्हाण, अरबाज शेख, मिलिंद शिंदे, सुरेश विश्वकर्मा, प्रणव रावराणे, श्वेतलाना अहिरे, अदिती सारंगधर, माधवी जुवेकर हे आहेत. साऊथचे कॅमेरामन एम. बी अलीकट्टी, नृत्य दिग्दर्शक साऊथचे हाईट मंजू हे आहेत. साउंड राशी बुट्टे, आर्ट महेश कोरे यांनी केले आहे. हा चित्रपट १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल अशी माहिती मजनू चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक