काॅग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली !

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या अंतर्गत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकी बाबत चर्चा व सविस्तर माहिती देऊन मतदार याद्याचं सादरीकरण करून ब्लॉक अध्यक्षांकडे देण्यात आल्या. त्यावेळी शरद आहेर यांनी निवडणूक कशा प्रकारे होणार याबाबत सविस्तर विवेचन केले, निवडणुकीत उभं राहण्यासाठी सभासद हा सक्रिय सभासद असला पाहिजे असे सांगितले. 

शिर्डी येथे १ व २ जून ला शिबीर संपन्न होणार आहे त्यात निवडक पदाधिकारी जाणार आहेत,  तसेच ११ जून ते १४ जून या कालावधीत शहर स्तरावरील एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.                     

 याप्रसंगी माजीमंत्री डॉ.शोभाताई बच्छाव , गटनेते शाहू खैरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल,  केशव अण्णा पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय राऊत, अनुजाती विभागाचे प्रदेश सचिव सुरेश मारू, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर, सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, अनिल कोठुळे ,स्वाती जाधव, अरुणा आहेर, ब्लॉक अध्यक्ष उध्दव पवार, विजय पाटील, कैलास कडलग, अण्णा मोरे, रामकीसन चव्हाण, राजकुमार जेफ, इसाक कुरेशी, आशा साळवे, संजय विभूते, आदिनाथ नागरगोजे, जावेद पठाण, अकिल कादरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग,,,,,,,,,, भाग २- लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!