पोस्ट्स

बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना !

इमेज
बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना !       नासिक::- सन २०२२-२३ या वर्षापासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विेविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून देणे साठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २०% मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन देणेची नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.           सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु.८,०००/- दुसऱ्या वर्षीं रु.९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनासाठीचा खर्च भागविण्यासाठी मदत म्हणून दरमह

सर्व धर्मोस्तू मंगलम् जयघोषात महामस्तकाभिषेक ! जैन तीर्थंकरांच्या शिकवणीनुसार सर्व धर्म समभावाचे दर्शन !!

इमेज
सर्व धर्मोस्तू मंगलम्   जयघोषात महामस्तकाभिषेक !  ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी)::-  काल मंगळवारी ( दि.२८) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे जैन तीर्थंकरांच्या शिकवणीनुसार सर्व धर्म समभावाचे दर्शन घडले.  सर्व धर्म मंगलम् अश्या  जयघोषात विश्व कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. उपस्थित भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला.                 सोमवारी रात्री परराज्यातील भाविक बसेस व खासगी वाहनांनी ऋषभदेवपुरम येथे दाखल झाले. त्यामुळे काल विविध प्रांतातील दिगंबर जैन समाजाचा मोठा मेळा जमला होता. उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात येथून अनेकजण आले. काल मंगळवारी ( दि. २७) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. प्रथम कलशाचा मान जैन समाजातील सर्व संत परंपरेचे पाईक असलेले श्रीपाल ग

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाची यात्रेदरम्यान रोज सजावट ! मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीतून सजावट करण्याचे अवघड कार्य !

इमेज
माडसांगवी(करण बिडवे)::- श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी आणि चांदीचा रथ पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रे साठी मार्गस्थ झाला असून या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले आहेत.  गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे पायी वारी बंद होती यंदा मात्र या वारीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. पायी वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे . कोरोनामुळे गेली दोन वर्षे रथ सजावटीची परंपरा बंद होती त्यामुळे सजावटकार मंडळी नाराज झाली होती. यंदा मात्र या मंडळीत चैतन्य संचारले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाला दररोज नवनवीन प्रकारची फुले, हार, तुरे, सजावटीच्या वस्तू वापरून आकर्षक सजावट केली जाते.  माडसांगवी येथील ह.भ.प. स्वर्गीय शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून ही रथ सजावट परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. यात्रा मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी निरनिराळ्या मित्रमंडळी कडून दररोज रात्री रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून हि मंडळी सुंदर सजावट करतात. साधारण एक महिना रथ वारी पंढरपूर पर्यंत चालत जाते. दररोज निराळ्या पद्धतीने नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून सुग

माधव सटवाणी यांना ३० जून रोजी कविकुलगुरू महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान !

इमेज
माधव सटवाणी यांना ३० रोजी कालिदास पुरस्कार प्रदान ! कोकण मराठी परिषद, गोवा उपक्रम . डॉ. महेश खरात यांची उपस्थिती ! पणजी ::- कोकण मराठी परिषद गोवा या संस्थेतर्फे दरवर्षी कविकुलगुरू महाकवी कालिदास पुरस्कार यंदा गोव्यातील ज्येष्ठ कवी माधवराव सटवाणी यांना जाहीर झाला असून येत्या ३० जून रोजी सायंकाळी ३.३० वाजता होणाऱ्या इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणाऱ्या समारंभात औरंगाबाद येथील डॉ. महेश खरात यांच्या हस्ते हा पुरस्कार माधव सटवाणी यांना प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून यापूर्वी गोव्यातील अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  माधव सटवाणी यांचा अल्प परिचय          माधव सटवाणी हे वाळपई तालुक्यातील वेळूस येथील असून गेली दशकांपासून त्यांचे कविता व इतर लेखन सातत्याने सुरू आहे. त्याचे ‘निमग्न’ आणि ‘एक शुभ्र टिंब’  हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या तिसऱ्या मराठी कवितासंग्रहाचे प्रकाशन लवकरच करण्यात येणार आहेत. इंग्रजी  वाङ्मय आणि सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन एम. ए.आणि एम. एड. असलेले प्रा. सटवाणी यांनी सत्तरी तालुक्यात १९६५ ते २००५ या

अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !

इमेज
अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !        नाशिक ( प्रतिनिधी ) अमास सेवा संस्था (मुंबई) यांच्या माध्यमातून जॉय ऑफ गिव्हिंग या सेवाभावी उपक्रमात डोल्हारमाळ केंद्रातील तेरा शाळेतील ५३३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यामध्ये स्कूलबॅग, रेनकोट ,वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वही, रंगपेटी, पाटी, पेन्सिल बॉक्स, शार्पनर, कंपास पेटी, लाकडी पट्टी, पेन्सिल पाऊच अश्या दैनंदिन आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश करण्यात आला. जॉय ऑफ गिव्हींगचे प्रमुख  विक्रमभाई मेहता व सहकाऱ्यांनी मनोगतात कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा नव्याने शैक्षणिक सत्र जोमाने सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या. दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी असे त्यांनी नमूद केले.            अमास सेवा संस्थेचे समन्वयक चंदकांतभाई देढिरा यांचे याप्रसंगी मोलाचे सहकार्य, योग्य नियोजन व मार्गदर्शन मिळाले. कुळवंडी केंद्रातील सहकारी शिक्षक विजय भोये, बहीरम, बोरसे, कोकणे, घंटेवाड तसेच मानकापूर शाळेचे माजी सहकारी दिलीप शिंदे या शिक्षकांचे अनमोल सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाच

वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा, महामस्तकाभिषेक संपन्न !

इमेज
वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा,  महामस्तकाभिषेक संपन्न ! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी  ( प्रतिनिधी )  सतत तेरा दिवस सुरू असलेल्या सोहळ्याची रंगत वाढत आहे. काल सोमवारी ( दि.२७) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे सकाळपासूनच मेघ दाटून आले होते. वर्षाऋतूमध्ये पावसाची सगळ्यांना आस लागली आहे. मोरांचा केकारव देखील सुरू आहे. अश्या अमृतमय वातावरणात भक्तीधारा बरसल्याने उपस्थित भाविकांनी जल्लोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंद मिळवला. अभिषेकानंतर दुपारी प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी सुरू झाली.    रविवारी रात्री मुंबई, डोंबिवली, कोल्हापूर, सोलापूर, नांदगांव, शिर्डी, मालेगाव, नाशिक, सटाणा येथून असंख्य भाविक खासगी वाहनांनी ऋषभदेवपुरम येथे दाखल झाले. त्यामुळे काल महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजाचा आणि मराठी मातीचा मोठा सहभाग होता. चेन्नई येथूनही काहीजण आले. काल सोमवारी( दि. २७) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या गिनीज विश्वविक्रमी १०८ फु

नासिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळा जि. सोलापूर येथे शाखा...

इमेज
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळ्याला शाखा...        नाशिक..दि.२४::-आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या करमाळा येथे नविन केंद्राचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, सहकार्यवाह गंगाधर कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य सर्वश्री सचिन पाडेकर, सुभाष सबनीस, उल्हास पंचाक्षरी रोहीणी कुलकर्णी, सुप्रिया सबनीस आणि केंद्राचे पदाधिकारी संतोष कुलकर्णी, सदस्य सुधीर पुराणिक, नरहरी होशिंग, सारंग पुराणिक, सुनिल कुलकर्णी, सुनिल देशमुख, राजेंद्र सुर्यपुजारी, निलिमा पुंडे, सागर कुलकर्णी उपस्थित होते.                उद्घाटनाच्या निमित्ताने सामुदायिक व्रतबंधाचे आयोजन करण्यात आले होते. अठरा बटुंचा व्रतबंध यावेळी पार पडला. केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या ध्येय धोरणानुसार आणि संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा केंद्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करू‌, तसेच विविध उपक्रम राबवून संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करू असे आश्वासन केंद्रप्रमुख संतोष कुलकर्णी यांनी यावेळी दिले. शेखर जोगळ