अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !

अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !
       नाशिक ( प्रतिनिधी ) अमास सेवा संस्था (मुंबई) यांच्या माध्यमातून जॉय ऑफ गिव्हिंग या सेवाभावी उपक्रमात डोल्हारमाळ केंद्रातील तेरा शाळेतील ५३३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यामध्ये स्कूलबॅग, रेनकोट ,वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वही, रंगपेटी, पाटी, पेन्सिल बॉक्स, शार्पनर, कंपास पेटी, लाकडी पट्टी, पेन्सिल पाऊच अश्या दैनंदिन आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश करण्यात आला. जॉय ऑफ गिव्हींगचे प्रमुख  विक्रमभाई मेहता व सहकाऱ्यांनी मनोगतात कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा नव्याने शैक्षणिक सत्र जोमाने सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या. दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी असे त्यांनी नमूद केले. 


          अमास सेवा संस्थेचे समन्वयक चंदकांतभाई देढिरा यांचे याप्रसंगी मोलाचे सहकार्य, योग्य नियोजन व मार्गदर्शन मिळाले. कुळवंडी केंद्रातील सहकारी शिक्षक विजय भोये, बहीरम, बोरसे, कोकणे, घंटेवाड तसेच मानकापूर शाळेचे माजी सहकारी दिलीप शिंदे या शिक्षकांचे अनमोल सहकार्य मिळाले.

या कार्यक्रमाच्या उल्लेखनीय बाबी म्हणजे केंद्रातील सर्वच शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केले. रीना सहारे या विद्यार्थीनीने आपल्या मनोगतातून सर्वच पाहुण्यांची मने जिंकली. लेझीम नृत्य व विविध आदिवासी गाण्यांवर मुलांचे अफलातून सादरीकरण करण्यासाठी श्रीमती बाविस्कर, वावरे, भोयने, राऊत यांनी विशेष मेहनत घेतली. मानकापूर गावातील सर्व नागरिकांनी सर्व पाहुणे, मुले, पालक, शिक्षक यांच्या जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली. शाळेचे शिक्षक कळमकर व थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !