बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना !


बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना !

      नासिक::- सन २०२२-२३ या वर्षापासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण

विभागामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी
आवश्यक विेविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून देणे साठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या अभ्यासक्रमासाठी शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २०% मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन
देणेची नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.

          सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु.८,०००/-
दुसऱ्या वर्षीं रु.९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक
महिन्यासाठी अदा केले जाईल, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनासाठीचा खर्च
भागविण्यासाठी मदत म्हणून दरमहा ४,०००/- रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल.
सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसया वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए अर्थात Bachler in Business Administration (Service Management) पदवी आणि तीन वर्ष काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्याथ्याचा दुहेरी फायदा होणार आहे.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८ ते २२ वयोगटातील नुकत्याच बारावी पास
झालेल्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती लीना बनसोड, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांचे मार्फत करण्यात येत आहे.
सदर योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ५
जुलै २०२२ अशी असून त्यासाठी https:/ltinyurl.com/Zpnashikibba2022 ही ऑनलाईन लिंक समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !