भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !
भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद ! नाशिक ( प्रतिनिधी )भारतीय भुलशास्त्र संघटना (आयएसए) नाशिक या संघटनेच्यावतीने युवा महाकॉन २०२२ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२३ आणि रविवार दि.२४ जुलै या कालावधीत हॉटेल एक्सप्रेस इन येथे ही राज्यस्तरीय परिषद होणार असल्याची माहिती डॉ. अनिता नेहेते व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयएसए नाशिक ही संघटना भूलतज्ज्ञांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी देखील संघटनेद्वारे उपक्रम राबविले जातात. यंदा पंचेचाळीस वयाच्या आतील भूलतज्ज्ञांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद आयोजीत करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांमध्ये आधुनिकता येत असतानाच भूलशास्त्रही प्रगत होते आहे. आरोग्य सेवेत भुलशास्त्र आणि भूल तज्ज्ञांचे महत्व अनन्य साधारण आहे. या शास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची, उपचार प्रणालीची सर्वांना माहिती व्हावी, विशेषतः वयाच्या पंचेचाळीशीच्या आतील भूल तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अन्य सहकाऱ्यांना ही लाभ मिळावा, त्