नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार !

नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार !

लातूर (प्रतिनिधी)::- डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ३१ जुलै रोजी वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.

      कथासंग्रह, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मचरित्र व आंबेडकरी साहित्य अशा सहा प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.
      प्रथम १५००/- द्वितीय १०००/- व तृतीय ७५०/- रुपये, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. एकुण १८ पुरस्कारांमध्ये बालसाहित्य गटांत नासिकच्या प्रा. सौ. सुमती पवार व कविता गटातून कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
        लातूर येथील बस स्थानकाशेजारील डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृहात ३१ जुलै रोजी सकाळी ११:३० वा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. अॅड. श्रीधर गायकवाड, सचिव प्रकाश घादगिने यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !