अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ अध्यक्षपदी विलास पोतदार तर कार्यवाह म्हणून सुभाष सबनीस यांची निवड...!


अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक विभागाचे अध्यक्षपदी विलास पोतदार तर कार्यवाह म्हणून सुभाष सबनीस यांची निवड...!

     नासिक::-अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी निवडीची घोषणा प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी नुकतीच केली आहे. अध्य‌क्षपदी वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार तर

कार्यवाहपदी सुभाषित प्रकाशनचे सुभाष सबनीस यांची तर उपाध्यक्षपदी ज्योती स्टोअर्सचे वसंतराव खैरनार यांची निवड झाली आहे.

खजिनदारपदी जी.पी. खैरनार यांना संधी देण्यात आली असुन कार्यकारिणी सदस्य म्हणून विनोद गोरवाडकर, सावळीराम तिदमे, किरण सोनार, संदीप देशपांडे, दिलिप बोरसे, विनायक रानडे, संतोष लहामगे, सौ.सुमती पवार, सौ.सुरेखा बो-हाडे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, कार्यवाह पराग लोणकर यांनी अभिनंदन केले आणि पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक विभागात प्रकाशक लेखक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील आणि साहित्यिक सांस्कृतिक आणि वैचारिक परीस्थितीत प्रगल्भता आणण्यासाठी प्रयत्न करू अशी भुमिका यावेळी नुतन अध्यक्ष विलास पोतदार यांनी व्यक्त केली. नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, कथालेखक संघाचे अध्यक्ष संतोष हुदलीकर, गझलकार अजय बिरारी, नरेंद्र पाटील यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनोखी गुरुवंदना, सदाबहार गाने सुहाने !

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !