पोस्ट्स

गुणवत्तापूर्ण व वैविध्यपूर्ण उत्पादनांचे "न्यू संस्कृती बुटीक" दालनाचे उद्घाटन !

इमेज
गुणवत्तापूर्ण व वैविध्यपूर्ण उत्पादनांचे "न्यू संस्कृती बुटीक"  दालनाचे उद्घाटन ! नाशिक । महिलांची वस्त्रप्रावरणे एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्‍या कॉलेजरोड वरील न्यू संस्कृती बुटीक या देखण्या दालनाचे उद्घाटन आरूषी भंडारे हिच्या हस्ते थाटात पार पडले. नाशिककर महिलांच्या अपेक्षांना अनुसरून गुणवत्तापूर्ण आणि वैविध्यपूर्ण उत्पादने दालनात सादर करण्यात आल्याचे गेली दोन दशके या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शीतल भंडारे यांनी यावेळी सांगितले.        अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, महिलांच्या ड्रेसचे डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्‍चरिंग हे आमच्या दालनाचे वैशिष्ट्य आहे. प्युअर सिल्क, कॉटन, ऑरगेन्जा, अजरक, मसलीन, लिनन या प्रकारांतील ड्रेस मटेरियल, डिझायनर साड्या, रेडीमेड ड्रेसेस तसेच विविध प्रकारांतील दुपट्टे, रेडीमेड प्रिंटेड सिल्क, पटोला बांधणी, सिल्क बांधणी आदी श्रेणींमधील साड्या येथे उपलब्ध राहतील. दरम्यान, उद्घाटन सोहळ्याला डॉ. पुजा पवार, अर्चना तांबे, हेमांगी पाटील, अश्‍विनी भामरे, हेमांगी पाटील, शीतल बिरारी, मिनल सावंत, सोनाली कुटे, सिबल सोनवणे, श्‍वेता पारख, पवित्रा पगार यांसह विविध

लीना बनसोड यांची व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती !

इमेज
लीना बनसोड यांची व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती ! नासिक::- जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळ नासिक येथे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लीना बनसोड लवकरच दीपक सिंगला (भाप्रसे) यांच्याकडून पदभार स्विकारणार आहेत. न्यूज मसाला च्या १ आक्टोबर च्या लेखातील आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !! होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे ! https://www.newsmasala.in/2022/10/blog-post.html

दहशतवादी संघटना आणि व्यक्तींकडून देशात अनेक ठिकाणी हल्ले होत असताना देश एकसंघ रहावा म्हणून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे- विशेष सरकारी वकील ऍड.शिशिर हिरे

इमेज
देशसुरक्षेची जबाबदारी प्रत्येकाचे आद्य कर्तव्य-ऍड.शिशिर हिरे      नाशिक:- परदेशातील दहशतवादी संघटना आणि व्यक्तींकडून देशात अनेक ठिकाणी हल्ले होत असताना देश एकसंघ रहावा म्हणून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ऍड.शिशिर हिरे यांनी केले.      राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या प्रा. जगदीश देवरे यांच्या 'फुलपाखरू' या कादंबरीचे प्रकाशन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनीयर बाळासाहेब मगर, प्रमुख पाहुणे डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप ठाकरे, मुक्त विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ.कविता साळुंखे, लेखक प्रा.जगदीश देवरे, शीतल देवरे मंचावर उपस्थित होत्या.      ऍड.शिशिर हिरे पुढे म्हणाले की, गंगापूर धरणासारखा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय हाताळताना किती सावधगिरी बाळगावी लागते, हे लेखकाने या कादंबरीत सिद्ध केले आहे. पहिलीच साहित्यकृती असतानाही या कादंबरीत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना कौतुकास्पद आहेत. अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब मगर म्हणाले की, इस्लामी दहशतवादासह हिंदूंमधील अतिसहिष्णुताही चिंतेच

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!

इमेज
प्रेस नोट 04.10.2022 आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! जिल्ह्याला मिळाले ३९ शिक्षक !! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !! नाशिक - राज्याच्या शिक्षण विभागाने आंतर जिल्हा बदली प्रक्रियेस मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आंतर जिल्हा प्रक्रियेस सुरवात केली. आंतर जिल्हा बदलीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या ३९ शिक्षकांना समुपदेशनाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पदस्थापना दिली,            यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, संतोष झोले, अधीक्षक श्रीधर देवरे, कक्ष अधिकारी रवींद्र आंधळे उपस्थित होते.          शासनाकडून आंतर जिल्हा बदलीने नाशिक जिल्ह्यात पदस्थापना मिळण्यासाठी ९८ शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे अर्ज केला होता यापैकी ३९ शिक्षक हे जिल्ह्यात आज रोजी हजर झाले, यामध्ये संवर्ग १ मध्ये ६, संवर्ग २ मध्ये ८ व सर्वसाधारण २५ अशा ३९ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली, ही प्रक्रिया पारदर्शीपणे समुपदेशनाद्वारे पार पडली, यामध्य

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित

इमेज
समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य  -ना. डॉ. गावित       नाशिक ( प्रतिनिधी ):- ज्येष्ठ पत्रकार आणि आदिवासी वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ना.डॉ.गावित यांनी देवधर यांच्या प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या 'समग्र वारली चित्रसृष्टी' आणि  'पद्मश्रींचे वारसदार' या पुस्तकांसाठी, तसेच त्यानिमित्ताने होणाऱ्या विविध उपक्रमांना शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.     कलासमीक्षक संजय देवधर यांची यापूर्वी प्रकाशित झालेली 'वारली चित्रसृष्टी' व इंग्रजी भाषेतील 'वारली आर्ट वर्ल्ड' ही पुस्तके बघून ना. गावित यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या दोन वर्षात देवधर यांनी वारली चित्रकलेच्या विविधांगी पैलूंवर सुमारे ६० लेख लिहिले.  नासिक मधून नियमित प्रकाशित होत असलेले साप्ताहिक न्यूज मसाला तसेच विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झाले. त्यातील निवडक ५० लेखांचे संकलन असलेले 'समग्र वारली चित्रसृष्टी' तसेच पद्

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

इमेज
आभाळाने नाकारलेल्या पंखांना विहाराचं सामर्थ्य द्यावं, उपेक्षितांना साधनांचं पाठबळ देत संधींची कवाडं खुली करावी, दुर्जनांचा समाचार घेत सज्जानांचा सन्मान करावा, सहकारी वर्गाला उंबुटू न्यायाने सर्वथैव लोकहिताचे आत्मभान द्यावे आणि सुशासनाच्या निर्मितीतून लोककेंद्री संविधानाचा पाया मजबूत करत राष्ट्रकार्यात स्वतःला समर्पित करावे, अशा पंचसूत्रीतून लोकसेवेचा परिपाठ पढवत लोकाभिमुख प्रशासनाची आश्वासक मांडणी करणारी 'भारत की बेटी' काल नाशिकमधून पुढील जबाबदारीसाठी मार्गस्थ झाली. व्रतस्थ लोकसेवेच्या या अग्रणीला निरोप देताना प्रशासनाचा जेव्हा कंठ दाटून आला तेव्हा एक सलाम हृदयापासून निघाला आणि शब्दरूप घेऊन कागदावर स्थिरावला.          होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.         पत्रकारितेच्या उण्यापुऱ्या अडीच दशकांत कितीतरी सनदी अधिकाऱ्यांशी संपर्क आला. पण, अशा अधिकाऱ्यांना निरोप देताना गहिवरलेले प्रशासन बघण्याचा दुर्मिळ योग कालचा दिवस पुढ्यात टाकून गेला. फार नाही, पण दोनच वर्षांच्या कारकीर्दीत नाशिक जिल्हा

निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा ! सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर !!

इमेज
निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा !  सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर  !!        नाशिक ( प्रतिनिधी ) निर्मिती पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून राजलक्ष्मी बँकेचे संचालक जगन (अण्णा) पाटील व नाशिकमधील प्रख्यात वास्तुविशारद अरुण काबरे उपस्थित होते. यावेळी गतवर्षीच्या तुलनेत ४४ लाखांची वाढ होऊन १ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे सांगण्यात आले. सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.   प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. निर्मिती पतसंस्था ही बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगले काम करत असल्याचे जगन(अण्णा) पाटील यांनी नमुद केले. संस्थेच्या संचालकांनी योग्य नियोजनामुळे संस्थेचा कारभार  प्रगतीपथावर नेला आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात संस्थेने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संस्थेचे कामकाज हे कौतुकास्पद असल्याचे नमुद केले. आर्कि.अरुण काबरे यांनी मनोगतात संस्थेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगितले व निर्मिती पतसंस्थेने जीवनगौरव केल्याबद्दल आभार मानले. ३१ मार्च अखेर निर्मिती पतसंस्थेस १ कोटी