समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पाला
सर्वतोपरी सहकार्य  -ना. डॉ. गावित
      नाशिक ( प्रतिनिधी ):- ज्येष्ठ पत्रकार आणि आदिवासी वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ना.डॉ.गावित यांनी देवधर यांच्या प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या 'समग्र वारली चित्रसृष्टी' आणि
 'पद्मश्रींचे वारसदार' या पुस्तकांसाठी, तसेच त्यानिमित्ताने होणाऱ्या विविध उपक्रमांना शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

    कलासमीक्षक संजय देवधर यांची यापूर्वी प्रकाशित झालेली 'वारली चित्रसृष्टी' व इंग्रजी भाषेतील 'वारली आर्ट वर्ल्ड' ही पुस्तके बघून ना. गावित यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या दोन वर्षात देवधर यांनी वारली चित्रकलेच्या विविधांगी पैलूंवर सुमारे ६० लेख लिहिले.  नासिक मधून नियमित प्रकाशित होत असलेले साप्ताहिक न्यूज मसाला तसेच विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झाले. त्यातील निवडक ५० लेखांचे संकलन असलेले 'समग्र वारली चित्रसृष्टी' तसेच पद्मश्री जिव्या सोमा मशे व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या वारली कला प्रसारातील योगदानाची दखल घेणारे 'पद्मश्रींचे वारसदार' ही दोन रंगीत सचित्र पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. १९७३ च्या सुमारास वारली चित्रशैलीचा पुनर्शोध घेऊन भास्कर कुलकर्णी यांनी ही कला प्रकाशात आणली. त्यालाही पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होत होतील. या औचित्याने वारली चित्रस्पर्धा, कार्यशाळा, वारली चित्रांची कलात्मक दिनदर्शिका व इतरही काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्या साठीही सहकार्य करण्याचे  आश्वासन ना.गावित यांनी देवधर यांना दिले. या भेटीच्या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, कळवणचे सामाजिक कार्यकर्ते एन.डी.गावित व सहकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!