समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी जनजागृती होणे गरजेचे ! आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (आयएसपीओ) संघटनेकडून प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन
समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी जनजागृती होणे गरजेचे ! अस्थिव्यंग जन्मतः असते किंवा काहीवेळा अस्थिरोगांंमुळे,अपघातांनी अस्थिव्यंग निर्माण होते. अस्थिरोग तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करतात. त्यातून रुग्ण बरे होतात. मात्र त्यामध्ये ऑर्थोटिक्स म्हणजे आधार देऊन बाह्योपचार व प्रोटेटिक्स म्हणजे कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या तज्ज्ञांची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (आयएसपीओ) या संघटनेने प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन जाहिर केला आहे. नाशिकमध्ये डॉ. दीपक सुगंधी त्यांच्या दीपक सर्जिकल्स संस्थेतर्फे ४४ वर्षे रुग्णसेवा करीत आहेत. या दिनाच्या निमित्ताने... ऑर्थोटिक्स अँड प्रोथेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ( ओपीएआय ) आज देशभर जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या विशेष प्रगत विज्ञान शाखेमुळे दिव्यांग व्यक्तींना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळण्यास मदत होते. वेगवेगळ्या क्षेत्रात जसा भारतात विकास होत आहे तसाच या क्षेत्रातही सातत्याने होतो आहे. त्यामुळे दिव्यांगांना सन्मानाने व आत्मविश्वासाने जीवन जगण्यास हातभार मिळतो. नवनवी