अजय कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर !

अजय कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर !

     लासलगाव::- येथील द्रोनागिरी आयुर्वेदालय चे संचालक अजय व्ही. कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारजाहीर करण्यात आला. कुमावत यांनी मागील पंधरा वर्षापासून सतत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.

त्यांच्या कार्याची दखल साई आधार सोशल हेल्थ फाउंडेशन नाशिक यांनी घेत पुरस्कारांची घोषणा केली. फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नांचा सन्मान सोहळा २०२२ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. कुमावत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल त्यांचे लासलगाव परिसरातील सर्व राजकीय क्षेत्र, व्यापारी बंधू, मित्रपरिवार व कुमावत समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे,

द्रोणागिरी आयुर्वेदालय च्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा गोर गरीब बांधवांना मोफत आयुर्वेदिक औषधांचे व जडीबुटीचे वाटप करणे, अनाथ आश्रमामध्ये वेळोवेळी अन्नदानाचे उपक्रम व धार्मिक संस्थांना मोफत पूजेचे साहित्याचे वाटप करून विविध उपक्रम वेळोवेळी राबविले आहेत. अजय कुमावत हे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी व्ही. टी. कुमावत यांचे लहान चिरंजीव व कक्ष अधिकारी, जिल्हा परिषद नासिक चे संजय कुमावत यांचे लहान बंधू आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक