मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले रेकॉर्ड वर्गीकरण करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्याचे अभिनंदन !

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले रेकॉर्ड वर्गीकरण करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्याचे अभिनंदन !

       नाशिक::- जिल्हा परिषदेत नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर कार्यरत झालेल्या श्रीमती आमिशा मित्तल ( आयएएस) यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान व रेकॉर्ड वर्गीकरण मोहीम करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार येवला तालुक्यातील पंचायत समिती येवला येथे सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम व रेकॉर्ड वर्गीकरणाचे कामकाज केले.

त्यामध्ये विशेष बाब म्हणजे वरिष्ठ सहाय्यक कैलास पुंडलिक आरखडे, शिक्षण विभाग पंचायत समिती येवला हे एका हाताने पूर्णतः अपंग कर्मचारी असून देखील त्यांनी रेकॉर्ड वर्गीकरणाचे कामकाज  पूर्ण केले.

त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले निदर्शनास आल्याने श्रीमती आमिशा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरखडे यांचे अभिनंदन केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक