पोस्ट्स

सदाचारी बनो जीवन में आगे बढो !

इमेज
सदाचारी बनो जीवन में आगे बढो !    नासिक::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यक्तिमत्व व बदलत असलेली शिक्षण पद्धती यांचे महत्व सांगण्यासाठी  दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.        आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिक्षणाचे बरेच उपयोग आहेत परंतु त्यास एक नवीन दिशा देणे आवश्यक आहे. शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. आपल्या जीवनात शिक्षणाची ही साधने वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व  आहे.आजच्या आधुनिक  आजच्या काळात शिक्षणाची पातळी वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात हे सांगताना त्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व त्याचे फायदे देखील विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांसमोर मांडले; तसेच करोना महामारी

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

इमेज
महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतावर मागील अनेक शतकांत विविध परकीय शक्तींनी आक्रमण केले तरीही आपण कायमच देश म्हणून अखंड राहिलो. संस्कृती, आहार, विचारात विविधता असूनही एवढा मोठा खंडप्राय देश म्हणून कसा टिकला, याचे आश्चर्य वाटते, पण अनेक आक्रमणानंतरही भारताला काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांनी एकत्र जोडून ठेवले, ही साहित्याची ताकद असून ते अमोघ आहे, जोपर्यंत हे दोन ग्रंथ आहेत तोपर्यंत देशाच्या धर्माला धोका नाही. भारताचा एकच धर्म तो म्हणजे साने गुरुजींनी आम्हाला शिकवलेला मानवता धर्म. जगाला प्रेम अर्पावे, हाच आमचा धर्म, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,

संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ !

इमेज
संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी  (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे  ऑनलाइन वाचन  आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ ! भारतीय राज्यघटना स्वीकारली गेल्याच्या दिवसाची आठवण  आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.                                           यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमातले सक्रिय सहभागी म्हणून संसदीय कामकाज मंत्रालयाने दोन डिजिटल पोर्टल्स  सुधारित आणि अद्ययावत केले आहेत. खास संविधान दिन, २०२२ साठी केलेल्या या पोर्टल्सपैकी एक राज्यघटनेची उद्देशिका इंग्रजी आणि आणि राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचीअंतर्गत नमूद केलेल्या २२ इतर भाषांमध्ये वाचण्यासाठी ( https://readpreamble.nic.in/  ) असून दुसरे  "भारतीय संविधानावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा" ( https://constitutionquiz.nic.in/  ) यासाठी आहे. संविधान दिनाच्या पूर

‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार ! गौरव२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

इमेज
‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव २८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण ! मुंबई, पुणे, नाशिक, दि. २५ नोव्हेंबर :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ.यशवंत मनोहर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.         या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनि

सचिन बेंडभर यांची आजोळ कविता शिष्यवृत्ती परीक्षेत !

इमेज
सचिन बेंडभर यांची आजोळ कविता शिष्यवृत्ती परीक्षेत ! - मंथन प्रकाशनाने कवितेला दिले मानाचे स्थान   पुणे २५ (प्रतिनिधी)::-पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील "आजोळ" या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या शिष्यवृत्तीच्या तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. या कवितेला मंथन प्रकाशनाने मानाचे स्थान दिले असून सलग दुसऱ्यांदा त्यांच्या कवितेचा समावेश थेट प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे.                     पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांची एकूण पन्नास पुस्तके प्रकाशित आहेत. कळो निसर्ग मानवा या त्यांच्या कवितेचा समावेश इयत्ता सहावीच्या सुगम भारती या पाठ्यपुस्तकात आहे. आता त्यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील "आजोळ" या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांच्याकडे पाचवीचा वर्ग असून विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती सराव चालू आहे. मंथन प्रकाशनाकडून त्यांनी प्रश्नपत्रिकेचे दहा संच मागवले होते. त्यातील तिसऱ्या संचात गुरुजींना व विद्यार्थ्

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा संपन्न !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा संपन्न !     मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बदलत्या तंत्रज्ञानातील अद्यावतपणाचे आकलन विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सहाय्य विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली.         यावेळी या क्षेत्रातील दिग्गज आस्थापने असलेले केपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले, पायथन आणि एसक्यूएल याबाबतची माहितीदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनेक बाबीदेखील समजून घेता आल्या. यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातील एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीकडून प्रमाणपत्रे देण्यात आली. त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात होतो. संस्थेचे सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संचालक प्रा. अशोक चव्हाण, नियुक्ती अधिकारी स्वप्निल देसा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

इमेज
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय एएमआर परिषदेत सहभागी !     नवी दिल्ली::- ही एक मूक आणि अदृश्य महामारी आहे ज्याकडे इतर सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांद्वारे दुर्लक्ष होऊ  शकत नाही , असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी म्हटले आहे. ओमान मधील मस्कत येथे  सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याची क्षमता (एएमआर) यावरील तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय परिषदेत मंत्रिस्तरीय पूर्ण सत्रात त्या आज बोलत होत्या. १५ हून अधिक देशांतील २२ प्रतिनिधी  या परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चार संस्थांद्वारे एएमआर वर बहु -भागधारक भागीदारी मंचाची सुरुवात करण्यात आली. एएमआर चा प्रसार आणि त्यानंतरच्या जीवघेण्या  परिणामांवर भर देत डॉ. पवार यांनी अधोरेखित केले की एएमआर  हा जागतिक आरोग्याला धोका असून त्याचे  आरोग्य, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या  गंभीर परिणाम होऊ शकतात. एएमआरचा सामना करण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांवर  लक्ष केंद्रित करत आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

इमेज
आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशी कोणताही संबंध नाही - दातार         नाशिक ( प्रतिनिधी ) - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तुपादेवी फाट्याजवळ असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. काल ( दि.२३)भ विविध वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले. नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था घारपुरे घाट, अशोकस्तंभ येथे गेली ६८ वर्षे निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन करते. या संस्थेचा संबंधित वृत्ताशी कोणताही संबंध नाही असे संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांनी सांगितले.    आधाराश्रमाचे सचिव सुनीता परांजपे व हेमंत पाठक म्हणाले,  सुप्रसिद्ध वैद्य आण्णाशास्त्री दातार यांनी १९५४ साली या संस्थेची स्थापना केली. अधिकृतपणे बालके दत्तक देणारी आधाराश्रम ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव सरकारमान्य संस्था आहे. सदर बातमीतील नामसाधर्म्यामुळे बऱ्याच हितचिंतक यांचे फोन आल्यामुळे व जनतेचा कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी आम्ही हा खुलासा करीत आहोत. यापूर्वी काहीवेळा आधाराश्रम ही आमचीच संलग्न संस्था असल्याचा खोटा प्रचार काही सस्थांनी केला होता, हे देखील  निदर्शनास आले होते असे पाठक यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !

इमेज
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !   दि.१ ते ३० नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे. निराधार बालक आणि अपत्यासाठी आसुसलेले पालक या दोन टोकांना दत्तक विधान एकत्र आणते. मात्र या क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन फसवणूक देखील केली जाते. बेकायदेशीर दत्तक प्रकरणे घडतात. नाशिकमध्ये आधाराश्रम ही सेवाभावी संस्था समाजाने नाकारलेल्या निरागस बालकांचे संगोपन करते. त्यांचे शैक्षणिक, मानसिक पालनपोषण करते. आरोग्याची काळजी घेते. अधिकृत दत्तक प्रक्रिया राबवून बालकांना हक्काचे पालक, कुटुंब मिळवून देते. आतापर्यंत सुमारे ९५० पेक्षा जास्त बालके देश-परदेशात दत्तक देण्यात आली आहेत.    रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस बालकांनाही इतरांसारखे आपल्याला आईबाबा असावेत, आपले घर असावे असे वाटते. प्रेम करणारी, हक्काची माणसे आजूबाजूला असावीत अशी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच अनाथ बालकांचीही  साहजिक इच्छा असते. दुसरीकडे चारचौघांप्रमाणे आपल्याही संसारवेलीवर बाळाच्या रूपाने  फूल फुलावे, आपला वंश पुढे सुरु राहावा असे अपत्य नसलेल्या जोडप्यांचे स्वप्न असते. या दोन्

कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-

इमेज
कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-        नाशिक मधील राज्य सरकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांची नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी ही बँक आधारवड म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी दिनांक २२ सप्टेंबर १९२० रोजी दिंडोरी येथे कै.माधवराव रामचंद्र तथा एम. आर. देशपांडे साहेब यांनी या बँकेची स्थापना केली. सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीसाठी तात्काळ मदत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना बचतीची देखील सवय लागावी या दूरदृष्टी विचाराने व उदात्त हेतूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या बँकेची त्यावेळी स्थापना करण्यात आली.    आज बँकेला १०२ वर्षे पूर्ण होऊन १०३ व्या वर्षात बँकेने पदार्पण केलेलं आहे. या १०२ वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात बँकेने अनेक चढउतार बघितलेले आहे, आणि अनेक संकटाशी देखील सामना करावा लागला आहे, हे जरी खरी असले तरी त्या त्या वेळी कार्यरत प्रामाणिक संचालक आणि पदाधिकारी यांची बँके प्रति असणारी निष्ठा, सन्माननीय सभासदांचा बँकेवर असणारा अतूट विश्वास आणि त्याचबरोबर बँकेची एक निष्ठेने सेवा करीत असणारे माजी व विद्यमान सेवक वर्ग यांचे योगदान निश्चितच मोजण्या