हमारे बाद हाल-ए-गम सुनाने कौन आएगा…?हंसाने तो सब आएंगे मगर हाल-ए-दर्द सुनानेवाला कौन आएगा ? खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…. रणजित राजपूत.
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते… आदरणीय… गेल्या ३२ महिन्यांपासून मी नाशिक चा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आपल्या सोबत होतो. आज मी या पदाची सूत्रे माझ्या ज्युनियर सहकारी श्रीमती अर्चना देशमुख मॅडम यांच्याकडे सोपवून नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू होणार आहे. ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेत १३ मार्च २०२० रोजी मी जिल्हा माहिती अधिकारी, नाशिकची सुत्र स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ २४ तास सोबत राहिलो. माझ्या नाशिकच्या पोस्टींगची २ वर्षे कोरोनासोबत गेली. विशेष म्हणजे कोरोना काळातील सर्व बातम्यांना आम्ही *C* ने क्रमांकाने सुरूवात केली. भविष्यात या बातम्यांच्या C क्रमांकाने आपण कधीही कोरोना काळातील संदर्भ म्हणून उपयोगात आणू शकाल. विशेष म्हणजे या सर्व काळातील वृत्तपत्रीय बातम्यांच्या कात्रणांचे डिजिटल संकलन ही एक मोठी उपलब्धी जिल्हा माहिती कार्यालयात भविष्यात सर्वांसाठी असेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा काळ आश्वासकपणे पार पाडू शकलो. असेच सहकार्य आपण भविष्यात श्रीमती देशमुख मॅडम व माझ्या सहकाऱ्यांना देत रहावे, विनंती. जिल्हा माहिती