पोस्ट्स

सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध !

इमेज
सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध ! सलग तिसऱ्या वर्षी १ जानेवारी रोजी ५२ संवर्गांच्या ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध !!             नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. सलग तिसऱ्या वर्षी सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सेवा ज्येष्ठतेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेसंबधी सूची हि प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर रोजी तयार करण्यात येऊन १ जानेवारी रोजी प्रसिद्ध  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने यावर्षी देखील गट क व गट ड संवर्गातील सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ५२ संवर्गाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या ह्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत असलेल्या गट क व ड मधील १६००० कर्मचाऱ्यांच्य

पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!

इमेज
पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!        पिंपळगाव ( प्रतिनिधी ):- नवनर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारीपासून पिंपळगाव बसवंत येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.१ ) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी समर्थ केंद्रापासून ते उमियाधाम या कार्यस्थळा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली व उत्साहात प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन झाले. विज्ञान व आध्यात्मिक शक्ती यांचा समन्वय घडविणारे सर्व कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ उमिया धाम येथे होतील.      उद्या पासून दि.२ ते ४ च्या दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेमध्ये सामूहिक जप, ध्यान व व्यायाम होतील. ९ ते १२ या वेळेत गायत्री महायज्ञ केला जाईल. उद्या दि.२ रोजी सकाळी ९ ते १२ देवपूजन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ संगीतमय प्रवचन होईल. दि.३ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत विराट गायत्री दीप महायज्ञ होईल. दि.४ रोजी सकाळी ९ ते १२ दीक्षा संस्कार, पूर्णाहुती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व बंधुभगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समस्

मराठा इतिहास विश्वकोश निर्मितीसाठी प्रयत्नशील !भारतीय इतिहास संशोधन परिषदेचाशिवाजी विद्यापीठासमवेत करार !

इमेज
मराठा इतिहास विश्वकोश निर्मितीसाठी प्रयत्नशील ! भारतीय इतिहास संशोधन परिषदेचा शिवाजी विद्यापीठासमवेत करार !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉ. उमेश अशोक कदम यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी अकरा वाजता परिषदेच्या वतीने त्यांचा आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासमवेत इतिहासासंदर्भात महत्वाच्या देवाण-घेवाणविषयीचा करार होत आहे. यात प्रामुख्याने मराठा इतिहासाच्या विश्वकोशाची निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राहणार आहे.            छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीजच्या सामग्री व हस्तलिखिते यांच्यावरील अभ्यासासाठी देवाणघेवाण, त्यांचे डिजिटलायझेशन, स्थानिक भाषेवर आधारित मराठा इतिहासावरील १० मोनोग्राफ प्रकाशित करणे, संशोधन पद्धती तसेच स्त्रोत यांच्यावरील कार्यशाळेचे आयोजन, मराठा इतिहासावरील स्थानिक परिसंवाद, मोठ्या संशोधन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे, ई-लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये सहभागी करणे तसेच ऑनलाइन व्याख्यानांची मालिका, मराठी भाषा आणि मोडी लिपी ऐतिहासिक अर्थ

आजपासून गायत्री महायज्ञ, संस्कार महोत्सव !

इमेज
आजपासून गायत्री महायज्ञ, संस्कार महोत्सव ! पिंपळगाव ( प्रतिनिधी ):- नवनर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारीपासून पिंपळगाव बसवंत येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.१ ) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी समर्थ केंद्रापासून ते उमियाधाम या कार्यस्थळा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तेथे मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन होईल. सर्व कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ उमिया धाम येथे होतील.     दि.२ ते ४ च्या दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेमध्ये सामूहिक जप, ध्यान व व्यायाम होतील. ९ ते १२ या वेळेत गायत्री महायज्ञ केला जाईल. दि. २ रोजी सकाळी ९ ते १२ देवपूजन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ संगीतमय प्रवचन होईल. दि.३ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत विराट गायत्री दीप महायज्ञ होईल. दि.४ रोजी सकाळी ९ ते १२ दीक्षा संस्कार, पूर्णाहुती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व बंधुभगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समस्त कच्छी गुजराती परिवार व गायत्री महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३७२०५२८२२ व ९८२३१३७०७५ या क्रमांकावर संपर्क साधता य

माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन !

इमेज
माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे   रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन       नाशिक :- माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'वळणवाट' या त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि.१जानेवारी रोजी) सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.      सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आमदार डॉ.सुधीर तांबे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे, ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रकाशक विलास पोतदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर हे सूत्रसंचालन करणार आहेत.      सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशन संस्थेने केले आहे.

खासदाराच्या अटकेसाठी शासकीय कर्मचार्‍यांची तीव्र निदर्शने ! कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यलयांमध्ये संप करण्याचा इशारा !

इमेज
खासदाराच्या अटकेसाठी शासकीय कर्मचार्‍यांची तीव्र निदर्शने ! कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यलयांमध्ये संप करण्याचा इशारा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे नेते आणि दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला तसेच सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांचा गळा दाबून ठार करण्याचा कट करणारे व वरिष्ठ महिला अधिकारी यांना लज्जा वाटेल अशा शब्दांत शिवीगाळ व अपशब्द वापरल्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये तृतीयश्रेणी, चतुर्थश्रेणी व परिचारिका वर्गातील कर्मचार्‍यांनी दुपारी तीव्र निदर्शने केली. यानंतरही कारवाई न झाल्यास मात्र सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संप करून कामकाज बंद करण्याचा आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहिल, असा इशाराही कर्मचार्‍यांनी दिला आहे.  राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने मुंबईत कामा रुग्णालयात ही निदर्शने करण्यात आली तर अन्यत्र महाराष्ट्रातील स

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !

इमेज
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !          नाशिक - वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. २५) रावसाहेब थोरात सहभागृहात पार पडले. त्यावेळी राज्य दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा.वा. ना.आंधळे. समवेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे, संमेलन उद्घघाटक ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, तसेच डॉ. लक्षराज सानप, मुंबई येथील डॉ. विजय दहिफळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.