माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन !

माजी आमदार यांच्या 'वळणवाट' काव्यसंग्रहाचे रविवारी (दि.१रोजी) प्रकाशन

      नाशिक :- माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'वळणवाट' या त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि.१जानेवारी रोजी) सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.

     सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आमदार डॉ.सुधीर तांबे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे, ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रकाशक विलास पोतदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर हे सूत्रसंचालन करणार आहेत.
     सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशन संस्थेने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! आयोजित कार्यशाळे च्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!