आजपासून गायत्री महायज्ञ, संस्कार महोत्सव !

आजपासून गायत्री महायज्ञ, संस्कार महोत्सव !
पिंपळगाव ( प्रतिनिधी ):- नवनर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारीपासून पिंपळगाव बसवंत येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि.१ ) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी समर्थ केंद्रापासून ते उमियाधाम या कार्यस्थळा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तेथे मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन होईल.

सर्व कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ उमिया धाम येथे होतील. 
   दि.२ ते ४ च्या दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेमध्ये सामूहिक जप, ध्यान व व्यायाम होतील. ९ ते १२ या वेळेत गायत्री महायज्ञ केला जाईल. दि. २ रोजी सकाळी ९ ते १२ देवपूजन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ संगीतमय प्रवचन होईल. दि.३ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत विराट गायत्री दीप महायज्ञ होईल. दि.४ रोजी सकाळी ९ ते १२ दीक्षा संस्कार, पूर्णाहुती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व बंधुभगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समस्त कच्छी गुजराती परिवार व गायत्री महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३७२०५२८२२ व ९८२३१३७०७५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!