पोस्ट्स

"बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक !

इमेज
  "बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक ! तालुका विज्ञान प्रदर्शनात देवरे विद्यालयाच्या भावीन बोरसे यास तृतीय क्रमांक प्राप्त !!        खोंडामळी (प्रतिनिधी)::- श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील इ.१०वी चा विद्यार्थी भाविन किशोर बोरसे याने सादर केलेल्या 'बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा' या उपकरणाने शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार व  नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला. सदर विज्ञान प्रदर्शन माध्यमिक विद्यालय सेजवा ता.जि.नंदुरबार येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) सतिष  चौधरी यांच्या हस्ते भावीन बोरसे यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरांकित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी डाॅ.युनूस पठाण उपशिक्षणाधिकारी ( माध्य.), निलेश पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार, जिल्हा मुख्याध्यापक सं

अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी जाहीर !

इमेज
अखिल भारतीय मराठा महासंघाची नाशिक कार्यकारिणी जाहीर !      नासिक (प्रतिनिधी)::- अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत पवार यांनी नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. नाशिक शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात नाशिक शहर युवक सरचिटणीस पदी उमेश अहिरे, नाशिक शहर युवक कार्याध्यक्ष पदी आशिष पुरी, नाशिक ग्रामीण मध्ये देवळा तालुका युवक अध्यक्ष पदी रविन्द्र पवार व बागलाण तालुका युवक अध्यक्ष पदी संदीप अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत पदभार सोपविण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणी व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांचे सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !

इमेज
महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !      नासिक::- पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये दिनांक ०९ ते १२ जानेवारी या कालावधीत "महाराष्ट्र ऑलिंपिक गेम्स २०२३" अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या, या क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील क्रीडा स्पर्धकांनी सहभाग घेतला व आपापल्या परीने उत्तम कामगिरी करत पदक मिळविले, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडा स्पर्धामध्ये वुशू या खेळात नाशिक जिल्ह्यातून "वुशू असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट" च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यांत मेघा पवार (सानसू) ब्रॉन्झ मेडल, अनिशा वर्मा (तावलू चनकॉन) ब्रॉन्झ मेडल असे दोन पदक प्राप्त केले. शिवाय महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नाशिक तर्फे प्रणाली शिंदे, यशस्वी साळवे आणि उमेश थोरे या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदविला व आपापल्या खेळांचे उत्तम प्रदर्शन करून पदक मिळविण्याचा प्रयत्न केला.        या सर्व खेळाडूंना त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक व वुशू असोसिएशन नाशिक डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष व कोच राजुराम जैस्वाल यांचे मार्गदर्शन मिळाले. झाले

नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !!

इमेज
नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !! नाशिक (प्रतिनिधी)::- येथील नमस्ते फाऊंडेशनच्या वतीने ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आंबेगण, तालुका दिंडाेरी येथे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.         सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते फाऊंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी काैतूक करून आभार मानले. यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल संदीप देव व आनंदी ग्रूपचे सहकार्य लाभले. याप्रसंगी तहसीलदार पंकज पवार, सुनीता वाणी, ज्याेती ठक्कर, आरती पाटील, शैला साठे, विजया लाेणारी, रितू अग्रवाल, वंदना गाडीलकर, दीप्ती साेनजे, संदीप देव, डॉ. आनंद अहिरे, दीपक अग्रवाल, राजेंद्र गुप्ते, आंबेगावचे सरपंच, उपसरपंच, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित हाेते.

युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी

इमेज
युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी      नाशिक : " छत्रपती शिवरायांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि इतिहासातील ध्रुवतारा स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन. या दुर्मिळ योगावर आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सारख्या मानवतावादी संघटनेच्या युथ रेडक्रॉस या उपयुक्त उपक्रमाला नाशिकचे युवक आपलेसे करत आहेत ही नाशिक रेडक्रॉस साठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या युथ रेडक्रॉस च्या वाटचालीत आम्ही खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन नाशिक रेडक्रॉस चे चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. मविप्र चे आर्किटेक्चर कॉलेज आणि नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या युथ रेडक्रॉस शाखांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर पी. एम. भगत होते तर सुप्रसिद्ध वास्तुरचना तज्ज्ञ प्रसन्न भोरे, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.विजय वाघ, आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्रा.आशीष खेमनार , प्रा. मेघा बुटे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच ! "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!

इमेज
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच !  "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!          नाशिक ( प्रतिनिधी ) - प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा  ‘बांबू’ चित्रपट लवकरच दि.२६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.     क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरूणाईला भुरळ घालणारे हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. य

महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प ! कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" ! मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !

इमेज
महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प ! कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" ! मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापिठ, विद्यार्थी कल्याण मंडळ आयोजित १७व्या आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रकल्प स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालय संशोधन केंद्राच्या पीएच. डी. विद्यार्थिनी, कु. सोनाली प्रकाश शिराळकर यांच्या महिला पोलीसांवरील संशोधन प्रकल्पास अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक मिळाले. मागील दोन वर्षासह सलग तीनही वर्षी त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली व त्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. मुंबई विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. त्यांच्या संशोधन प्रकल्पाचा विषय होता "मुंबईतील महिला पोलीसांमधील सामर्थे, संधी, दुर्बलता व आवाहनांचे विश्लेषण" (A Study on SOWC Analysis of Women Police in Mumbai Region).       यानंतर कु. सोनाली  राज्यस्तरीय आविष्कार आंतर-विद्यापीठ स्पर्धेत मुंबई वि