महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प ! कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" ! मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !

महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प !
कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" !
मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !

        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापिठ, विद्यार्थी कल्याण मंडळ आयोजित १७व्या आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रकल्प स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालय संशोधन केंद्राच्या पीएच. डी. विद्यार्थिनी, कु. सोनाली प्रकाश शिराळकर यांच्या महिला पोलीसांवरील संशोधन प्रकल्पास अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक मिळाले. मागील दोन वर्षासह सलग तीनही वर्षी त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली व त्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या.

मुंबई विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. त्यांच्या संशोधन प्रकल्पाचा विषय होता "मुंबईतील महिला पोलीसांमधील सामर्थे, संधी, दुर्बलता व आवाहनांचे विश्लेषण" (A Study on SOWC Analysis of Women Police in Mumbai Region). 
     यानंतर कु. सोनाली  राज्यस्तरीय आविष्कार आंतर-विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापिठाचे पीएच. डी. गटात प्रतीनिधीत्व करतील. जी स्पर्धा जानेवारी २०२३ मध्ये सावित्रीबाई फूले पूणे विद्यापिठात होणार आहे. 
        मुंबई शहर, उपनगर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग येथील ११ क्षेत्रीय प्राथमिक फेर्‍यांच्या पीएच. डी. विद्यार्थी गटाच्या साधारण २५ स्पर्धकांच्या पोस्टर व पोडियम सादरीकरणातून उत्तम ५ प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. सदर अंतिम फेरीचे आयोजन ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात केले होते. सोनाली शिराळकरांच्या संशोधन प्रकल्पाला सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉ. विष्णू ज. भंडारे यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।