महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !


महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !


     नासिक::- पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये दिनांक ०९ ते १२ जानेवारी या कालावधीत "महाराष्ट्र ऑलिंपिक गेम्स २०२३" अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या, या क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील क्रीडा स्पर्धकांनी सहभाग घेतला व आपापल्या परीने उत्तम कामगिरी करत पदक मिळविले, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडा स्पर्धामध्ये वुशू या खेळात नाशिक जिल्ह्यातून "वुशू असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट" च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यांत मेघा पवार (सानसू) ब्रॉन्झ मेडल, अनिशा वर्मा (तावलू चनकॉन) ब्रॉन्झ मेडल असे दोन पदक प्राप्त केले. शिवाय महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नाशिक तर्फे प्रणाली शिंदे, यशस्वी साळवे आणि उमेश थोरे या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदविला व आपापल्या खेळांचे उत्तम प्रदर्शन करून पदक मिळविण्याचा प्रयत्न केला.


       या सर्व खेळाडूंना त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक व वुशू असोसिएशन नाशिक डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष व कोच राजुराम जैस्वाल यांचे मार्गदर्शन मिळाले. झालेल्या सर्व खेळाडूंचे विविध स्थरावरून कौतुक  होत असून  त्यांना वुशू असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिटचे उपाध्यक्ष निलेश दळवी व जनरल सेक्रेटरी ए. ए. भोसले यांनी अभिनंदन केले.  
       ६ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात उशू हा खेळ सुरु असून प्रथमच या वर्षी महाराष्ट्र ओलम्पिक गेम मध्ये नाशिक टीम सहभागी झाली होती. पदार्पणातच नाशिक जिल्ह्यासाठी २ मेडल प्राप्त केले गेले यात नाशिक चे कोच राजुराम जैस्वाल यांच्या परिश्रमाने यश प्राप्त झाले.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।