पोस्ट्स

वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई करणार- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई करणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील               मुंबई दि. २ : राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशु वाटप वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड ऑनलाईन पद्धतीने केली जाते. नागपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती. यामध्ये अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल ,  अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.             नागपूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडे वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठीचे अर्ज प्रलंबित असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.             मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की ,  नागपूर ,  वर्धा ,  पुणे ,  सोलापूरमध्ये दुधाळ गायी ,  म्हशींचे गट वाटप करणे ,  शेळी ,  मेंढी गट वाटप करणे ,  एक हजार कुक्कुट मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थसाहाय्य देणे ,  १०० कुक्कुट पिलांच्या वाटपासाठी

अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची संधी : -बाळासाहेब सोनवणे !

इमेज
अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची संधी : -बाळासाहेब सोनवणे ! डे केअरमध्ये विज्ञान दिनानिमित्त बालवैज्ञानिक क्रितिका व ऋतुजा यांचा सत्कार  नाशिक : (प्रतिनिधी) डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनने स्पेस झोन इंडिया व डॉ. मार्टिन इन्स्टिटयूट यांच्या सहकार्याने पिको सॅटेलाइट पाच हजार मुलांनी विकसित केलेल्या 150 पिको सॅटेलाइटचे हायब्रीड रॉकेटचे यशस्वीरित्या तामीळनाडू येथून अवकाशात प्रक्षेपण केले. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचे सोने करावे, असे प्रतिपादन डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांनी केले.  ज्ञानवर्धिनी  विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, बालवैज्ञानिक मा.गि. दे.पाटील माध्यमिक विद्यालय, महिरावणी येथील क्रितिका खांडबहाले, कु. ऋतुजा काशीद, पालक विलास काशीद होते. वसंतराव एकबोटे सेवानिवृत्त मायको कर्मचारी व ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव गोपाळराव पाटील आ

काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन ! "कवितेमुळे भारत-नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम

इमेज
काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन ! "कवितेमुळे भारत नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम जागतिक मातृभाषा दिनानिमित्त नेपाळ येथे आयोजित बहुभाषिक विश्व साहित्य संमेलनातून !     काठमांडू (न्यूज मसाला वृत्तसेवा)::- अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनाच्या सहअध्यक्ष म्हणून नांदेडच्या साहित्यिक डॉ.ज्योती कदम या  आमंत्रित होत्या. बहुभाषिय संमेलनामुळे नेपाळ- भारत मैत्रीचे धागे अधिक घट्ट होतील असा विश्वास डॉ.ज्योती कदम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.  डॉ.ज्योती कदम  यांच्या "आदिम जाणीव" या कवितेने उपस्थित रसिक - श्रोते यांना मंत्रमुग्ध करीत रसिकांची दाद मिळवली.       भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि . सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ -भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले . त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली,

होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन !

इमेज
होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन !          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : होळी सणासाठी मध्य रेल्वे मार्गावर ९० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सणादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल- छपरा दरम्यान आणखी १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई- गोरखपूर एसी स्पेशल गाडीच्या ४ सेवा धावणार आहेत. गाडी क्रमांक ०२५९८ एसी होळी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ मार्च आणि १२ मार्च रोजी १२.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०२५९७ गाडी गोरखपूरहून १३ मार्च आणि १० मार्च रोजी रात्री ८.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ७.२५ वाजता पोहोचेल. यासोबत पनवेल-छपरा स्पेशल गाडीच्या ६ सेवा धावणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कावर बुकिंग १ मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर खुले होणार आहे.

जिल्हाभरात 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' जनजागृती अभियानाला सुरवात !

इमेज
जिल्हाभरात 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' जनजागृती अभियानाला सुरवात ! १ ते ८ मार्च दरम्यान चित्ररथ आणि पथनाट्यातून होणार जनजागृती !         नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांना महिला दिनानिमित्त जनजागृती अभियान राबविण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हाभरात मुलगी वाचवा, मुलगी शिकवा (बेटी बचाव, बेटी पढाओ) अभियान राबवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य विभागास दिले होते त्यानुसार "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा" अभियानाला (बेटी बचाव, बेटी पढाओ) झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून दि.०१ मार्च ते ०८ मार्च महिला दिनापर्यंत जिल्ह्यात आरोग्य विभाग व अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ररथ आणि पथनाट्याद्वारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभेच्छा दिल्या. पथनाट्य समूहाने जिल्हा परिषद आवारात अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर पथनाट्याचे सादरीकरण करत मुलगी वाचवा,

जयपुर फूटसाठी नावनोंदणीचे आवाहन !

इमेज
जयपुर फूटसाठी नावनोंदणीचे आवाहन !       नाशिक ( प्रतिनिधी ) प.पू.आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी यांच्या पुण्यतिथि व उत्तर भारतीय प्रवर्तक प. पू. श्री आशीष मुनिजी यांच्या जन्मदिवसानिमित्त श्री नवकार आशीष सेवा ट्रस्ट, साधुवासवानी मिशन पुणे, निवासी अपंग कल्याण केंद्र सटाणा, बागलाण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाना विनामूल्य कृत्रीम अवयव ( जयपूर हात, पाय) बसविण्यासाठी सटाणा येथे दि.२६ मार्च रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील गरजू रुग्ण त्यात सहभागी होऊ शकतील.    या शिबीराअंतर्गत कृत्रीम अवयव बसविण्यासाठी गरजुंनी बुधवार दि.१५ मार्च  पर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. रविवारी दि.२६ मार्च रोजी सटाणा येथे बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत सकाळी ९ पासून तज्ज्ञांकडून प्रत्यक्षात माप घेतले जाईल. हे शिबीर पूर्णपणे विनामूल्य असुन जास्तीत जास्त गरजुंनी या ऊपक्रमात सहभागी होऊन अपंगत्वावर मात करावी. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी निलेश जे.भंडारी यांच्याशी ९८५०९०५७६७ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही संयोजकांनी कळविले आहे

“भारत देश मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग या आजारांची राजधानी बनू पहात आहे.”- डॉ. उज्ज्वल कापडणीस

इमेज
“भारत देश मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग या आजारांची राजधानी बनू पहात आहे.”- डॉ. उज्ज्वल कापडणीस          नासिक (सुचेता बच्छाव)::- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विद्यालय, गंगापुर रोड च्या संचालिका मनीषा दीदी यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवात ध्रुवनगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. कापडणीस आणि सहकाऱ्यांनी  मधुमेह, हृदयरोग आणि ब्लड प्रेशर या आजारां बद्दल  माहिती देऊन मार्गदर्शन केले.      डॉ. कापडणीस यांनी या सर्व आजारांचे मूळ आपल्या बदललेल्या जीवनशैलीत आहे असे सांगितले, शारीरिक हालचालींचा आभाव, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी  , प्रचंड ताणतणाव , बैठी जीवनशैली, रासायनिक कीटक नाशकांचा शेतीत केला जाणार प्रचंड वापर यांमुळे हे आजार उधभवतात. काही वेळी या आजारांना अनुवंशिकता ही कारणीभूत असते असेही ते म्हणाले.  या आजरांपासून सुटका होण्यासाठी लोकांनी आहारात बदल, विविध शारीरिक व्यायाम , नियमित शारीरिक तपासणी, दिलेल्या औषधांचे नियमित सेवन, ताणतणावांचे व्यवस्थापन, ध्यानधारणा करणे अशा प्रकारचे उपाय करणे आवश्यक आहे असे डॉ. कापडणीस यांनी