होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन !

होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन !

         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : होळी सणासाठी मध्य रेल्वे मार्गावर ९० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सणादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल- छपरा दरम्यान आणखी १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई- गोरखपूर एसी स्पेशल गाडीच्या ४ सेवा धावणार आहेत.


गाडी क्रमांक ०२५९८ एसी होळी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ मार्च आणि १२ मार्च रोजी १२.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०२५९७ गाडी गोरखपूरहून १३ मार्च आणि १० मार्च रोजी रात्री ८.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ७.२५ वाजता पोहोचेल. यासोबत पनवेल-छपरा स्पेशल गाडीच्या ६ सेवा धावणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कावर बुकिंग १ मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर खुले होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !